आरोग्य – एपिलेप्सीबाबतचे गैरसमज

फिट्स येणे, आकडी, मिरगी अशा नावांनी एपिलेप्सी अर्थात अपस्मार हा आजार ओळखला जातो. एपिलेप्सी आणि त्याच्याशी संबंधित कोणत्याही विकाराच्या प्रकाराचे निदान सुरुवातीच्या टप्प्यावर अचूक झाले तर रुग्णाला योग्य ते उपचार मिळायला मदत होते. आपल्या समाजात या अपस्माराबद्दल असलेल्या गैरसमजुती बघता या आजाराबाबत अधिक जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.

एपिलेप्सीबाबत असलेले गैरसमज दूर करा 

एपिलेप्सी हा दुर्मीळ नसून देशातील लाखो व्यक्तींमध्ये पाहायला मिळतो. हा एक न्यूरोलॉजिकल डिसॉर्डर आहे. डोक्याला दुखापत होणे, मेंदूचा संसर्ग, स्ट्रोक, ब्रेन टय़ूमर, अल्झायमर रोग, मेंदूची विकृती आणि आनुवंशिक पूर्वस्थिती यांसारखे घटक एपिलेप्सीला कारणीभूत ठरतात. हे सामान्यत: सर्वच वयोगटांतील लोकांमध्ये दिसून येते.

जेव्हा मेंदूसंबंधित क्रियांमध्ये तात्पुरता व्यत्यय येतो तेव्हा अपस्माराचे झटके येतात हा एक गैरसमज पाहायला मिळतो. एपिलेप्सी हा एक न्यूरोलॉजिकल डिसॉर्डर आहे. ज्यामध्ये वारंवार झटके येतात.

अपस्मारामध्ये वेगवेगळय़ा स्वरूपात झटके येतात, प्रत्येकाची वेगळी लक्षणे असतात. यातल्या मोटार स्किल्समध्ये असामान्य हालचाली, स्नायूंचा कमकुवतपणा किंवा कडकपणा आणि स्नायू मुरगळणे यांचा समावेश असू शकतो. यामध्ये नॉन -मोटर स्किल्सदेखील उद्भवू शकतात जसे की, संवेदनाक्षम होणे, भावनिक, वैचारिक किंवा सामान्य हालचालींचा अभाव दिसून येऊ शकतात.

अपस्माराचे प्रकार हे तरुण व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात आढळतात आणि वयानुसार त्यांची वारंवारता कमी होते. झोपेचा अभाव, तणाव, मद्यपान किंवा मादक पदार्थांचा वापर, ताप किंवा आजार, हार्मोनल बदल, पोषण किंवा विशिष्ट औषधांमुळे ही समस्या उद्भवू शकते.

एपिलेप्सी हा मेंदूच्या असामान्य क्रियांमुळे होणारा

न्यूरोलॉजिकल डिसॉडर असून त्यामुळे अनेकदा नैराश्य आणि मानसिक तणावास सामोरे जावे लागते. एपिलेप्सीला मानसिक रोगांत वर्गीकरण करू नये. अपस्मार असलेल्या लोकांच्या जीवनाच्या गुणवत्तेवर याचा परिणाम होतो.

डॉ. पंकज अग्रवाल, 

न्यूरोलॉजिस्ट, ग्लोबल हॉस्पिटल्स, परेल येथे न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख