उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच अधिकृत; सामान्य प्रशासन विभागात शिंदेंचा पक्ष बेदखल

शिवसेना आमचाच पक्ष असा दावा शिंदे गट करीत असला तरी राज्याच्या सामान्य प्रशासनाच्या लेखी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना अधिकृत असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण सरकारच्या वतीने प्रसिद्ध करण्यात येणारे जीआर आणि परिपत्रकांची प्रत सर्व प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यालयांना रवाना केली जाते. सामान्य प्रशासन विभागाच्या यादीमध्ये शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर असा पत्ता आहे. िंशदे यांच्या पक्षाच्या नावाचाही उल्लेखही या यादीमध्ये नाही. त्यामुळे सामान्य प्रशासन विभागाच्या लेखी उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हाच अधिकृत पक्ष असल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले.

राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने २०२३ ची राज्य अधिस्वीकृती व विभागीय अधिस्वीकृती समिती स्थापन केल्याचा शासन निर्णय मंगळवारी जारी केला. या निर्णयाची प्रत राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव यांच्यासह २५ विभागांना तसेच भाजप महाराष्ट्र प्रदेश कार्यालय, योगक्षेमसमोर, काँग्रेस टिळक भवन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ठाकरसी हाऊस, शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर मुंबई-२८, बहुजन समाज पक्ष, चेंबूर, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), वरळी, मनसे, राजगड, दादर या पत्त्यावर पाठवली जाते. पण िंशदे गटाच्या पक्षाचा या यादीत कुठेही उल्लेख नाही. िंशदे यांच्या गटाने मंत्रालयासमोर पक्ष कार्यालय थाटले Dााहे, पण या पक्ष कार्यालयाचा कुठेही यादीत उल्लेख नाही. त्यामुळे िंशदे गटाच्या पक्षाच्या पत्त्यावर कोणतीही प्रत पाठवली जात नाही. याचा अर्थ सामान्य प्रशासन विभागाच्या लेखी िंशदे यांच्या गटाच्या पक्षाला अधिकृत मान्यता नसल्याचे स्पष्ट झाले आहे याकडे एका अधिकार्‍याने लक्ष वेधले. केवळ ११ जुलैचाच जीआर नव्हे तर यापूर्वीही जारी करण्यात आलेल्या जीआरची प्रत िंशदे यांच्या पक्षाच्या कार्यालयाला पाठवण्यात आलेली नाही असेही स्पष्ट केले.

राष्ट्रवादीही शरद पवारांचीच

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचाच असा दावा केला आहे. त्यांच्या गटानेही मंत्रालयासमोरील बंगल्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष कार्यालय स्थापन केले आहे. पण सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने जीआरची प्रत बॅलर्ड पिआर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, ठाकरसी हाऊस या पत्त्यावर पाठवली जाते. त्यामुळे शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस याच पक्षाची सरकारदरबारी नोंद आहे याकडे सरकारी अधिकार्‍यांनी लक्ष वेधले.