‘निर्णय वेगवान’… गृहनिर्माण खातं जाण्याच्या आदल्याच दिवशी फडणवीसांनी धारावी टाकली अदानींच्या खिशात

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने सुमारे वीस हजार कोटी रुपयांच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम अदानी समूहाला देण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त 15-16 जुलै रोजी आलं. यावर उलट सुलट चर्चा सुरू झाल्या, धारावीकरांची बाजू लढवणाऱ्या धारावी बचाव आंदोलन समितीच्या सदस्यांनी याला विरोध दर्शवला आहे. आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडून गृहनिर्माण मंत्रिपदाचं खातं अतुल सावे यांच्याकडे जाण्याच्या आदल्या दिवशीच हा निर्णय घेतल्याचं कळतं आहे. सर्वोच्च न्यायालयात अदानींवर केस सुरू असतानाच त्यांच्यावर सवलतीचा वर्षाव सुरू असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

गृहनिर्माण मंत्रिपदाच खात त्यांच्याकडून अतुल सावे यांच्याकडे जायच्या आदल्याच दिवशी नागपूरकर फडणविसांनी धारावीबद्दल अधिसूचना काढली. सुप्रिम कोर्टात अदानीबद्दल केस चालू असताना अदानींवर सवलतिचा वर्षाव होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

कम्युनिस्ट नेते कॉ. प्रकाश रेड्डी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, ‘देवेंद्र फडणविसांची आणखी एक कूटनिति.
गृहनिर्माण मंत्रिपदाच खातं त्यांच्याकडून अतुल सावे यांच्याकडे जायच्या आदल्याच दिवशी नागपूरकर फडणविसांनी धारावीबद्दल अधिसूचना काढली’. सर्वोच्च न्यायालयात अदानींबद्दल केस सुरू असताना अदानींवर सवलतीचा वर्षाव केल्याचंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

‘मुंबई अदानीच्या घशात? असा सवाल करत त्यांनी पुढं लिहिलं आहे की ‘एअरपोर्ट, अदानी ईलेक्ट्रिसिटी आणि आता एअरपोर्टच्या बाजूला दादर, माटुंगापर्यंत पसरलेला धारावीचा परिसर’, असं देखील त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अदानी यांना धारावी पूनर्विकास करण्यासाठी दिलेल्या सवलतींमधील तरतूदींमधून पर्यावरणाचा ऱ्हास होण्याची भिती देखील त्यांनी व्यक्त केली आहे. यात ते म्हणातात की, ‘8 ते 10% एफएसआय, स्लम GST मध्ये सवलती, TDR मध्ये सवलती, ट्रान्सिट कॅप बांधण्यासाठी कांजूरमार्ग, घाटकोपर येथील मिठागराची जमीन देणार म्हणजेच पर्यावरणाचा सत्यानाश’.

‘स्पेशल प्रॉडक्ट व्हेअकल SPV स्थापून सरकारी पैसा व अदानींचा फायदा’, असा आरोप देखील त्यांनी व्यक्त केला आहे. त्याच सोबत कॉर्पोरेट धार्जिणी कूटनिती हाणून पाडा. अदानी हटवा, धारावी वाचवा, मुंबई वाचवा तसंच भाजप हटाव, देश बचाव’ असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.