गौतम अदानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

अदानी ग्रुपचे अध्यक्ष गौतम अदानी हे पुन्हा एकदा देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सच्या यादीनुसार, गौतम अदानी यांची एकूण नेटवर्थ 97.6 बिलियन डॉलर आहे. दुसऱया स्थानावर रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आहेत. त्यांची एकूण नेटवर्थ 97 बिलियन डॉलर आहे. मुकेश अंबानी गेल्या अनेक महिन्यांपासून देशातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत अव्वल स्थानावर होते. 3 जानेवारी 2025 ला सर्वोच्च न्यायालयाकडून हिंडनबर्ग रिसर्च प्रकरणात अदानी ग्रुपला क्लीन चिट मिळाल्यानंतर अदानी ग्रुपच्या शेअरमध्ये वाढ पाहायला मिळाली. त्यामुळे एकूण मार्केट कॅप 15.60 लाख कोटी रुपये पार गेले.