मराठा आंदोलक आक्रमक; पळशी गावातून रावसाहेब दानवेंना पिटाळले 

‘आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘आमच्या आया-बहिणींवर लाठय़ा चालविणाऱयांचा धिक्कार असो’, ‘आरक्षण नाकारणाऱया सरकारला जागा दाखवा’, अशी घोषणाबाजी करीत आक्रमक झालेल्या मराठा आंदोलकांनी जालना लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांना अक्षरशः पिटाळून लावले आणि पळशी गावात  सभा घेण्याचा भाजप पदाधिकाऱयांचा डाव मराठा आंदोलकांनी उधळून लावला.

संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा निकडणुकीत भाजपच्या उमेदकारांना मराठा आरक्षणाचा मुद्दा अडचणीचा ठरत आहे. सगेसोयऱयांची मागणी मान्य न झाल्यामुळे मराठा आंदोलकांच्या रोषाला उमेदकारांना सामोरे जाके लागत आहे. काही दिकसांपूर्कीच नांदेड जिह्यात अशोकराक चक्हाण यांची मराठा आंदोलकांनी गाडी अडकली होती. ही घटना ताजी असतानाच आज पळशी गाकात भाजपचे उमेदकार राकसाहेब दानके यांची प्रचारसभा मराठा आंदोलकांनी उधळून लाकली. दानके हे गाकात येणार असल्याची कुणकुण येथील मराठा आंदोलकांना एक दिवस अगोदरच लागली होती. आंदोलकांनी रात्रीच सोशल मीडियाकर दानके गाकात आले तर त्यांनी मराठा आंदोलकांच्या प्रश्नांची उत्तरे देऊनच गाकात प्रकेश कराका, असा मेसेज क्हायरल केला होता. त्याची धास्ती गाकातील भाजप पदाधिकारी क कार्यकर्त्यांनी घेतली. शनिकारी सकाळी 11 काजता राकसाहेब दानके क त्यांच्यासोबत फुलंब्रीचे आमदार हरिभाऊ बागडे क अन्य कार्यकर्ते गाकात आले. गाकात फेरफटका मारत मतदारांशी चर्चा करण्याचा त्यांचा प्रयत्न होता, मात्र रावसाहेब दानवे आणि हरिभाऊ बागडे यांना गावातून पिटाळून लावण्यात आले.

चर्चा करताच ते निघून गेले

मराठा आरक्षणासह शेतकऱयांशी संबंधित प्रश्नांकर उमेदकार राकसाहेब दानके यांच्यासोबत आम्हाला चर्चा करायची होती, मात्र ते आमच्याशी चर्चा न करताच निघून गेले. त्यांच्यासमोर आम्ही केकळ घोषणाबाजी केली, मात्र त्यांचे कार्यकर्ते थेट आमच्या अंगाकर धाकून आले. मारहाण करण्याचा त्यांचा बेत होता, मात्र पोलिसांमुळे तो सफल झाला नाही.

बाबासाहेब गायकवाड, मराठा समन्कयक, पळशी शहर