बँकेच्या आयमोबाईल अॅपमध्ये गडबड

आयसीआयसीआय बँकेचे मोबईल अॅप आयमोबाईल पेवर टेक्निकली समस्या येत आहेत. या प्लॅटफॉर्मवर इतरांची संवेदनशील व्रेडिट कार्डची माहिती दिसत आहे, असा दावा ग्राहकांकडून करण्यात आला आहे. ही माहिती समजताच आयसीआयसीआय बँकेने कारवाई केल्याने आता ग्राहकांना आयमोबाईल अॅपवर व्रेडिट कार्डचा तपशील पाहता येत नाही. टेक्नोफिनोचे संस्थापक सुमंता मंडल यांनी या घटनेची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आहे. या पोस्टसह त्यांनी आयसीआयसीआय बँक आणि देशातील पेंद्रीय बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियालाही टॅग केले आहे व त्यांना या प्रकरणात त्वरित लक्ष घालण्यास सांगितले आहे. या समस्येवर तत्काळ उपाय म्हणून, आम्ही ही कार्ड
ब्लॉक केली असून ग्राहकांना नवीन कार्ड वितरीत करत आहोत. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असे बँकेने म्हटले आहे.