गिर्यारोहकांसाठी खूशखबर;  गोरेगावात साकारली क्लाइंबिंग वॉल

प्रातिनिधीक फोटो

नैसर्गिक कडेकपाऱ्यांतील चढाई तंत्रशुद्ध व सुरक्षित पद्धतीने व्हावी यासाठी नियमित सराव आवश्यक आहे. परंतु मुंबईपासून दूर जाऊन नियमित सराव करणे गिर्यारोहकांना शक्य नसते. मात्र आता गोरेगावातच 43 फुटांची क्लाइंबिंग वॉल साकारण्यात आली असून गिर्यारोहकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

    गोरेगाव पूर्व येथील नंदादीप शाळेच्या प्रांगणातील अरुण सामंत क्लाइंबिंग वॉल पुन्हा सुरू करण्यात आली आहे. डोंगराळ भागात आढळणाऱ्या कडेकपाऱ्यांची हुबेहूब प्रतिकृती या भिंतीवर साकारलीय. अरुण सामंत हे उत्कृष्ट गिर्यारोहक आणि अभ्यासू निसर्गप्रेमी होते. दुर्दैवाने हिमालयातील गिर्यारोहण मोहिमेत त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ सामंत कुटुंबीयांनी अभिनव शिक्षण प्रसारक मंडळासाठी ही कृत्रिम भिंत उभारली. 28 एप्रिलला नामवंतांच्या उपस्थितीत या भिंतीवर दिमाखदार प्रात्यक्षिके होणार आहेत.