आईवडिलांना झोपेच्या गोळ्या द्यायची मग गुपचूप प्रियकराला बोलवायची; 3 महिन्यानंतर उघडकीस आला प्रकार

फोटो प्रातिनिधीक

एका दाम्पत्याला गेले तीन महिने रात्री छान झोप लागत होती. कष्ट करत असल्याने आपल्याला झोप लागत असेल असं या दाम्पत्याला वाटत होतं मात्र झोपेचं खरं कारण कळाल्यानंतर या दोघांची झोपच उडाली आहे. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधल्या तिवारीपूर भागात एका तरुणाला शेजारपाजारच्यांनी पकडलं आणि बेदम मारहाण केली. त्याला केलेल्या मारहाणीत दाम्पत्याला लागणाऱ्या छान छोपेचं रहस्य लोकांना कळालं. मारहाण करण्यात आलेला राजेश (बदललेलं नाव) हा त्याची प्रेयसी सविता(बदललेले नाव) ला भेटायला तिच्या घरी गेला होता. राजेशला भेटता यावं , मज्जा करता यावी यासाठी सविता तिच्या आई वडिलांना झोपेच्या गोळ्या देत होती. तीन महिने सविताने तिच्या आई वडिलांना जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळून जेवू घातलं होतं. बुधवारी राजेश सविताला भेटण्यासाठी तिच्या घरी गुपचूप जात असताना लोकांनी त्याला पकडून मारहाण केली होती.

सविता ही दहावीत शिकत असून तिचं राजेशवर प्रेम आहे. राजेशला निवांत भेटता यावं, आपल्या भेटीत कोणाचा अडथळा असू नये यासाठी सविताने तिच्या आईवडिलांना जेवणातून झोपेच्या गोळ्या देण्यास सुरूवात केली होती. हा प्रकार शेजार-पाजारच्यांच्या लक्षात आला होता. त्यांनी हा प्रकार सविताच्या आईवडिलांना सांगितला होता. आईवडिलांनी सगळ्यांसोबत मिळून या दोघांचे बिंग फोडण्याचा निर्णय घेतला होता. बुधवारी सविताने झोपेत जेवणाच्या गोळ्या मिसळल्या खऱ्या मात्र तिच्या आईवडिलांनी जेवणच केलं नाही. ते पाळत ठेवून झोपण्याचं नाटक करत होते. मध्यरात्री जसा राजेश घरात आला तसा त्याला सगळ्यांनी पकडला आणि चोपून काढला. राजेशचा आरडाओरडा ऐकून बरीच लोकं सविताच्या घराबाहेर जमा झाली. राजेशच्याही घरी ही गोष्ट कळाली ज्यामुळे त्याचे आईवडीलही धावत आले.सदर प्रकाराची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सगळ्यांना शांत केलं आणि सविताच्या घरच्यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे सदर प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

तिवारीपूर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी सदर प्रकाराबाबत बोलताना म्हटले की, आम्ही माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलो. हा प्रकार गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. प्लॅनिंगनुसार ही तरूणी अनेकदा तिच्या प्रियकराला घरी बोलावत होती. प्रियकर येणार असेल त्या दिवशी ही तरुणी आई-वडिलांना झोपेच्या गोळ्या देऊन झोपवायची. बुधवारीही असाच प्रकार घडला होता मात्र पालकांना शंका आल्यानं त्यांनी जेवणं टाळलं होतं. सविताच्या आईवडिलांनी ब्लँकेट ओढून घेत झोपण्याचं नाटक केलं होतं. तरुण त्यांच्या घरात येताच स्थानिक लोकांच्या मदतीने त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.