आंबेडकरी अनुयायांनी महाविकास आघाडीच्या ऊमेदवारांना मतदान करावे- डॉ.संजय बापेरकर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेले भारतीय “संविधान” वाचवायचे असेल तर सर्व आंबेडकरी अनुयायांनी महाविकास आघाडीच्या ऊमेदवारांना मतदान करावे,असे आवाहन कामगार नेते डॉ.संजय कांबळे-बापेरकर यांनी आज रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत केले.

खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला उमेश कदम,नरेश जाधव आणि संदेश जाधव उपस्थित होते. पुढे बोलताना कामगार नेते डॉ.संजय कांबळे-बापेरकर म्हणाले की,महाराष्ट्रात येऊन,मोदी-शहा बोलत आहेत की, भाजपा संविधान बदलणार नाही – विरोधक अपप्रचार करीत आहेत. परंतु हे जर खरे असते तर त्यांच्या खासदारांनी आणि नेत्यांनी संविधान बदलण्याची भाषा केली, त्यांचेवर कारणे दाखवा नोटीस- निलंबनासारखी कारवाई का केली नाही ? कर्नाटकचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी जाहीर सभेत म्हटले आहे की, भाजपाला 400 पार हा आकडा संविधान बदलण्यासाठी हवा आहे. अयोध्येचे खासदार लल्लु सिंह यांनी ही अश्याच प्रकारचे वक्तव्य केले आहे. झाशी येथील भाजपाच्या नेत्या श्रीमती मधु मिश्रा यांनी तर ज्यांची जागा आमच्या चप्पल जवळ होती ते संविधानामुळे आमची बरोबरी करीत आहेत, त्यामुळे हे संविधान बदलले पाहीजे असा निर्धार बोलून दाखवला आहे.त्यामुळे संविधान वाचवायचे आहे त्याकरिता आंबेंडकरी अनुयायानी महाविकास आघाडीला मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले.

पुढे बापेरकर म्हणाले की, ज्यापध्दतीने भाजपा राजकारण करीत आहे, विरोधकांना संपविण्यासाठी त्यांचे पक्ष फोडीत आहे, आमदार , खासदारांना प्रलोभने दाखवुन,आपल्याकडे वळवणे तसेच ईडी/सिबिआय चा गैरवापर करणे, निवडणुक आयुक्तांना हाताशी धरणे हे सर्व प्रकार संविधानाची पायमल्ली करणारे आहेत. त्यामुळे भाजपाला सत्तेपासुन रोखले तरच “संविधान” आबाधित राहील आणि त्यासाठीच खर्या अर्थाने भाजपाच्या विरोधात असणारे सर्व पक्ष आपा-पसातील मतभेद बाजुला सारुन, देशात ‘ईंडिया आघाडी’ व महाराष्ट्रात ‘महाविकास आघाडीत’ सामिल झाले आहेत. म्हणुनच सर्व आंबेडकरी अनुयायांनी “संविधान” वाचविण्यासाठी ‘महाविकास आघाडी’ च्या ऊमेदवारांना मतदान करून,मतविभागणी टाळावी,असे आवाहन डॉ.बापेरकर यांनी केले आहे.