‘एनडीए’च्या पासिंग परेडला लष्करप्रमुख उपस्थित

पुण्यातील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) नुकतीच 146 व्या बॅचची पासिंग परेड पार पडली. या परेडमध्ये लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी हजेरी लावली. या वेळी लष्करप्रमुखांनी परेड कमांडर आणि कॅडेट्सचे कौतुक केले. जनरल मनोज पांडे म्हणाले, तुमच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या प्रसंगी तुम्हाला संबोधित करणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. तुम्ही अत्यंत कठीण सराव करून यशाचे शिखर गाठले आहे. त्यासाठी मी तुमचे अभिनंदन करू इच्छितो. परेडमधील महिला कॅडेट वास्तविक स्वरूपात नारी शक्तीचे प्रतीक असल्याचे ते म्हणाले.