SSC Result 2024 : विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, दहावीचा निकाल 27 मे रोजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. दहावीचा निकाल हा 27 मे रोजी म्हणजेच येत्या सोमवारी लागणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली आहे.

बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी; राज्याचा निकाल 93.37 टक्के

बारावीच्या परीक्षेचा निकाल बोर्डाने 21 मे रोजी जाहीर केला होता. त्यानंतर दहावीचा निकालही लवकरच लागेल असं सांगण्यात येत होतं. आता दहावीचा निकाल 27 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल mahresult.nic या वेबसाइटवर पाहता येईल. दुसरीकडे दहावीच्या निकालापूर्वीच अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रियाही सुरू झाली आहे.