83 हजार हिंदुस्थानी नागरिकांनी देश सोडला

गेल्या पाच वर्षांत 83 हजार 468 हिंदुस्थानी नागरिकांनी हिंदुस्थानचे नागरिकत्व सोडून ब्रिटिश नागरिकत्व घेतले आहे. युरोपातील कोणत्याही देशात हे प्रमाण सर्वाधिक आहे. ब्रिटनमध्ये सर्वाधिक 2 लाख 50 हजार हिंदुस्थानी राहत असून त्यातील 1 लाख 15 हजार विद्यार्थी आहेत. ते ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी गेले आहेत, तर 1 लाख 27 हजार लोक हे कामानिमित्त ब्रिटनमध्ये गेले आहेत. ब्रिटनमध्ये राहणाऱया हिंदुस्थानी नागरिकांनंतर दुसऱया क्रमांकावर नायजेरियन लोकांचा नंबर आहे. त्यांची संख्या 1 लाख 41 हजार आहे, तर चिनी लोकांची संख्या 90 हजार आहे. पाकिस्तानातील 84 हजार लोक ब्रिटनमध्ये राहतात.