Lok Sabha Elections 2024 : मतदानानंतर राहुल गांधी यांचा आईसोबत सेल्फी; भाजपवर निशाणा साधत नागरिकांना आवाहन

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. यामध्ये दिल्लीतील लोकसभेच्या सर्व सात जागांवरही मतदान सुरू आहे. काँग्रेस नेते खासदार सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांनीही आज मतदान केले. प्रियंका गांधी यांनीही आपल्या मतदानाचा हक्का बजावला. मतदान केल्यानंतर राहुल गांधी यांनी आई सोनिया गांधी यांच्यासोबत सेल्फी काढला. राहुल गांधी यांनी ट्विट करून हा फोटो शेअर केला.

राहुल गांधी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. पहिल्या पाच टप्प्यांतील मतदानात तुम्ही खोटा, द्वेषपूर्ण आणि वाईट प्रचार नाकारत मूलभूत मुद्द्यांना प्राध्यान्य दिलं. आज सहाव्या टप्प्याचं मतदान आहे. तरुणांना 30 लाख सरकारी नोकऱ्या, गरीब कुटुंबातील महिलांना साडेआठ हजार रुपये महिना, शेतकरी कर्जमाफी, एमएसपी, रोजंदार मजुरांना 400 रुपये मिळावे यासाठी तुमचं प्रत्येक मत असेल, असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं.

सहाव्या टप्प्यातील प्रचार थंडावला; लोकसभेच्या 58 जागांवर आज मतदान

तुमचं मत हे आपल्या सर्वांचं आयुष्य चांगलं घडवण्यासाठी आणि त्याच बरोबर लोकशाही आणि संविधानाचे रक्षणही करेल. मी आणि आईने लोकशाहीच्या महापर्वात मतदान करून आपलं योगदान दिलं आहे. तुम्ही सर्व मोठ्या संख्येत घराबाहेर पडा, आपला अधिकार आणि कुटुंबाच्या भवितव्यासाठी मतदान करा, असं राहुल गांधी म्हणाले.