चार महिन्यांत 70 हजार कोटींचा चुना, सायबर क्राईमचा धोका वाढला

देशात सायबर क्राइमची प्रकरणे वाढत आहेत. नॅशनल सायबर क्राईम रिपार्टिंग पोर्टलवर दररोज सात हजार सायबर गुन्हय़ांसंबंधीची प्रकरणे नोंदवली जाताहेत. इंडियन सायबर क्राईम को-ऑर्डिनेटर सेंटरच्या  माहितीनुसार, कंबोडिया, म्यानमार, लाओस येथून फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. 2024 च्या पहिल्या चार महिन्यांतच वेगवेगळ्या पद्धतीच्या सायबर गुह्यांमध्ये हिंदुस्थानींचे 7061 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलेय.

इंडियन सायबर क्राईम को-ऑर्डिनेटर सेंटरचे सीईओ राजेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पद्धतीच्या गुह्यांमध्ये वापरले जाणारी अनेक वेब ऑप्लिकेशन्स चीनच्या मंदारिन भाषेत आहेत. त्यामुळे हिंदुस्थानातील सायबर गुह्यांमागे चीनचा हात असण्याची शक्यता अधिक आहे. विशेष म्हणजे चीन देशालाही स्कॅमचा फटका बसलेला आहे.

कसे होतात स्कॅम

सायबर गुन्हेगार दक्षिण – पूर्व आशियाई देशात खोटया नोकऱयांचे जाळे पसरवतात. त्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट स्कॅम, ट्रेडिंग अॅप स्कॅम, डेटींग स्कॅममध्ये अडकवले जाते. हिंदुस्थानींच्या सिमकार्डांचाही वापर केला जातो. सायबर अधिकार्यांनी मागील चार महिन्यांत तीन लाख 25 हजार बनावट अकाऊंट गोठवले आहेत. आयटी कायद्यांतर्गत तीन हजारांहून अधिक बेवसाईट्स आणि 595

अॅप ब्लॉक केले आहेत. जुलै 2023 पासून पाच लाख 30 हजार सिमकार्ड आणि 80848 आयएमइआय रद्द केले आहेत. 2024 मध्ये ( 30 एप्रिलपर्यंत) सायबर गुह्यांची सात लाख 40 हजार प्रकरणे नोंदवली आहेत. 2023 मध्ये 15 लाख 60 हजार प्रकरणे होती.

 चार महिन्यांतील सर्वाधिक  स्कॅम

n डिजिटल अरेस्ट स्कॅम 120.30 कोटी

n ऑनलाइन ट्रेडिंग स्कॅम 1420. 48 कोटी

n इन्व्हेस्टमेंट स्कॅम 222. 58 कोटी

n रोमान्स/ डेटिंग स्कॅम 13.23 कोटी