‘थलैवा’ला यूएईचा गोल्डन व्हिसा

दाक्षिणात्य अभिनेते रजनीकांत यांना यूएई संस्कृती आणि पर्यटन विभागाकडून गोल्डन व्हिसा मिळाला आहे. रजनीकांत नुकतेच अबूधाबी येथे गेले होते. तिथे त्यांना गोल्डन व्हिसा सन्मानपूर्वक देण्यात आला. हा सन्मान दिल्याबद्दल रजनीकांत यांनी सरकारचे आणि लुलु समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एम. ए. युसूफ अली यांचे आभार मानले आहेत. हा सन्मान स्वीकारतानाचे पह्टो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘अबूधाबी सरकारकडून प्रतिष्ठत यूएई गोल्डन व्हिसा मिळाल्यामुळे मला खूप भारी वाटतंय. या व्हिसासाठी आणि सर्व सहकार्यासाठी मी अबूधाबी सरकारचे आणि माझा चांगला मित्र युसूफ अली यांचे मनापासून आभार मानतो, असे रजनीकांतने म्हटले आहे.