शंभर टक्के साक्षर केरळात सर्वाधिक बेरोजगार

पीरियोडिक लेबर फोर्स सर्व्हेचा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला असून वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीत 15 ते 29 वयोगटातील बेरोजगारांचे प्रमाण केरळमध्ये सर्वाधिक असल्याचे या अहवालात म्हटले आहे. दिल्लीमध्ये बेरोजगारांचे प्रमाण कमी आहे. देशाचा बेरोजगारी दर 17 टक्क्यांवर असल्याचे या अहवालात म्हटले आहे. देशातील दिल्ली (3.1 टक्के), गुजरात (9टक्के) हरयाणा (9.5 टक्के) असा सर्वात कमी बेरोजगारीचा दर आहे. महिला बेरोजगारांचे प्रमाण जम्मू-कश्मीरमध्ये सर्वाधिक 48.6 टक्के आहे. केरळपाठोपाठ (46.6 टक्के) उत्तराखंड (39.4 टक्के), तेलंगणामध्ये (38.4 टक्के) आणि हिमाचल प्रदेशमध्ये (35.9 टक्के) बेरोजगारी दर आहे.