एअर इंडिया कर्मचाऱयांना पगारवाढ आणि बोनसही मिळणार

तब्बल दोन वर्षांनतर एअर इंडियाच्या कर्मचाऱयांना पगारवाढ मिळाली आहे. तसेच पायलटना बोनसही मंजूर झाला आहे. ही वेतनवाढ एप्रिल 2024 पासून लागू होणार आहे. एअर इंडियाची सूत्रे टाटा समूहाकडे गेल्यानंतर दोन वर्षांतच कर्मचाऱयांना पगारवाढ मिळाली आहे. तसेच पायलटना आर्थिक वर्ष 2023-24 मधील कामगिरीच्या आधारे बोनस दिला जाणार आहे. कंपनीतील क्लास 1 अधिकारी आणि कॅप्टन यांना मासिक वेतनात 5 हजारांची पगारवाढ होणार आहे, तर कमांडर आणि ज्येष्ठ कमांडर यांना मासिक वेतनात 11 ते 15 हजार वाढ असेल. कनिष्ठ क्लास 1 ऑफिसरच्या मासिक वेतनात कोणतीही वाढ प्रस्तावित नसून त्यांना वार्षिक 42 हजार रुपये बोनस मिळणार आहे, तर क्लास 1 अधिकाऱयांना 60 हजार, कमांडर्सना 1 लाख 32 ते 1 लाख 80 हजार रुपये बोनस मिळणार आहे.