60 लाख मोबाईल नंबर बंद होणार

टेलिकॉम विभागाने टेलिकॉम कंपन्यांना एक लिस्ट दिली असून नंबर तपासण्याचे आदेश दिले आहेत. 6 लाख 80 हजार मोबाईलची संख्या असून या नंबरला फेक किंवा बनावट डॉक्युमेंटचा आधार घेऊन चालू केल्याचा संशय टेलिकॉम विभागाला आहे. टेलिकॉम कंपन्या या सर्व मोबाईलची पडताळणी करणार असून यात काही संशयास्पद आढळल्यास कंपनी देशातील 6 लाख 80 हजार मोबाईल नंबर बंद करणार आहे. यासाठी कंपन्यांना दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. टेलिकॉम डिपार्टमेंटने एआयच्या मदतीने या नंबरची ओळख पटवली आहे. टेलिकॉम विभागाने आतापर्यंत 1.7 कोटीहून जास्त फेक मोबाईल कनेक्शन बंद केले आहेत. यातील 19 लाख मोबाईलचा वापर सायबर गुन्हेगारीसाठी करण्यात आला होता.