रविवारी रेमल चक्रीवादळ घोंघावणार

रेमल नावाचे चक्रीवादळ बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनाऱयावर उद्या, 26 मे रोजी धडकण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 26 मेच्या मध्यरात्री हे वादळ सागर द्वीप आणि खेपूपाडा यादरम्यान जाऊ शकते. या वेळी 100 ते 120 किमी ताशी वेगाने हवा पाहायला मिळू शकते. त्यामुळे या ठिकाणच्या लोकांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. 25 मेच्या रात्रीपासून हे वादळ उत्तरपूर्वेच्या दिशेने जाऊ शकते. मध्य बंगालच्या खाडीतील लाटा 6 ते 9 मीटर उंच जाऊ शकतात. यामुळे नागरिकांनी या ठिकाणी जाऊ नये असा अलर्ट देण्यात आला आहे. या वादळाला ‘रेमल’ असे नाव देण्यात आले आहे.