केदारनाथमध्ये हेलिकॉप्टरच्या गटांगळ्या; पायलटच्या प्रसंगावधानाने भाविक बचावले!

केदारनाथमध्ये आज मोठा अपघात टळला. हेलिकॉप्टर पायलटच्या प्रसंगावधानाने यात्रेकरूंचे प्राण वाचले. केदारनाथ यात्रेदरम्यान पायलटसह सहा यात्रेकरूंना घेऊन जाणाऱया हेलिकॉप्टरला तांत्रिक बिघाडामुळे शुक्रवारी पहाटे केदारनाथमध्ये आपत्कालीन लँडिंग करावे लागले. हेलिकॉप्टर हिमालय मंदिराजवळील हेलिपॅडपासून काही मीटर अंतरावर उतरले. पायलटसह विमानातील सातही जण सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱयाने दिली.

क्रिस्टल एव्हिएशनचे हेलिकॉप्टर सेरसी हेलिपॅड येथून केदारनाथ धामला जात होते. त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी 7 वाजून 5 मिनिटांनी इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हेलिकॉप्टरच्या इमर्जन्सी लँडिंगचा व्हिडीओ व्हायरल होतोय. पायलट कल्पेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रवाशांना सुखरूप उतरवण्यात आले. हेलिपॅडपासून 100 मीटर अंतरावर हेलिकॉप्टर उतरावे लागले. इमर्जन्सी लँडिंग झाले नसते तर मोठा अनर्थ झाला असता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

व्हीआयपी दर्शन बंद

केदारनाथ धाम येथे दिवसागणिक भाविकांची गर्दी वाढत आहे. आतापर्यंत तीन लाख 20 हजारांहून अधिक जणांनी बाबा केदारनाथचे दर्शन घेतले. वाढती गर्दी पाहून गर्भगृहातील दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्याला विरोध झाल्यानंतर गर्भगृह दर्शन पुन्हा सुरू झाले. केदारनाथ येथे व्हीआयपी दर्शन अद्याप बंद आहे.

n केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर सेवा नेहमीच जोखमीची राहिली आहे. केदारनाथमध्ये गेल्या 11 वर्षांत 10 अपघात झाले आहे. त्यामुळे पायलटने दाखवलेल्या प्रसंगावधानाने 7 प्रवाशांचा जीव वाचला.