सरकार श्रीमंतांचे हित जपते; अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांचे परखड मत

सरकार केवळ श्रीमंतांचे हित जपते. देशातील निरक्षरता, गरीबांसाठी आरोग्य सेवेचा अभाव आणि कमालीची लैंगिक असमानता यांमुळे गरीबांना प्रगती करणे कठीण झाले आहे, असे परखड मत ‘नोबेल’ पारितोषिक विजेते आणि अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी मांडले आहे. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

जातनिहाय जनगणनेचा विचार केला जातो असे सांगून त्यांनी याबाबत सातत्याने टाळाटाळ करणाऱया मोदी सरकारला अप्रत्यक्षरीत्या सल्ला दिला. त्याचबरोबर देशाला चांगले शिक्षण, आरोग्यसेवा आणि लैंगिक असमानता याद्वारे वंचितांच्या अधिक सक्षमीकरणाची गरज असल्याचेही अमर्त्य सेन म्हणाले. हिंदुस्थानसारख्या लोकशाही देशाचा नागरिक असल्याचा मला प्रचंड अभिमान आहे, परंतु देशाचे लोकशाही स्वरूप वाढवण्यासाठी अधिक मेहनत करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

…तर इतर धर्मीयांना फसवण्यासारखे
राज्यघटना बदलणे हे सरकारच्या विशिष्ट धर्मावर अधिक लक्ष पेंद्रित करण्याशी जोडले जाऊ शकते, परंतु हिंदुस्थानातील सामान्य लोकांना त्याचा काहीही फायदा होणार नाही, याकडेही अमर्त्य सेन यांनी लक्ष वेधले. तसेच अयोध्या राम मंदिर आणि सीएएच्या माध्यमातून भाजपला निवडणुकीत जास्त जागा मिळाल्याच्या प्रश्नावर त्यांनी हिंदुस्थान हा धर्मनिरपेक्ष राज्यघटना असलेला धर्मनिरपेक्ष देश असून केवळ हिंदूंवर लक्ष पेंद्रित करणे म्हणजे देशाच्या धर्मनिरपेक्ष मूळ आणि बहु-सांस्कृतिक स्वरूपाचा विश्वासघात करण्यासारखे आहे, असेही ते म्हणाले.