शिक्षक भारतीचे शेकडो पदाधिकारी शिवसेनेत

शिक्षक भारतीच्या शेकडो पदाधिकाऱयांनी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जाहीर प्रवेश केला. ‘मातोश्री’ निवासस्थानी झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात त्यांनी शिवबंधन बांधून आपल्या कामाची जबाबदारी स्वीकारली.

शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे, प्रकाश शेळके, आर बी पाटील, सलीम शेख, मच्छिंद्र खरात, शशिकांत उतेकर व इतर पदाधिकाऱयांनी शिक्षक भारतीला रामराम ठोकत ज. मो. अभ्यंकर सरांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिक्षक सेनेत प्रवेश केला होता. आमदाराने निवडलेला वारसदार व  त्याची एकाधिकारशाही याला कंटाळून शेकडो पदाधिकाऱयांनी हाती शिवबंधन बांधले. जवळपास 200 कार्यकर्त्यांनी आज शिक्षक सेनेत विविध पदांवरच्या नियुक्त्या स्वीकारल्या. इतक्या मोठय़ा प्रमाणात पदाधिकाऱयांनी शिक्षक भारतीचा त्याग करून शिक्षक सेनेत प्रवेश केल्यामुळे व जबाबदाऱया स्वीकारल्यामुळे ज. मो. अभ्यंकर सरांचा विजय हा निश्चित मानला जात आहे. शिक्षक सेनेने मुंबईतील 17 विभागांच्या पदाधिकाऱयांची कार्यकारिणी शुक्रवारी जाहीर केली. त्यात मोठय़ा प्रमाणात शिक्षक भारतीतील पदाधिकाऱयांचा समावेश केला गेला. प्रवेश केलेल्या पदाधिकाऱयांमध्ये कwलास गुंजाळ, संतोष शिंदे, नागनाथ व्हटकर, प्रशांत बचुटे, मुंबई उपाध्यक्ष विजय गवांदे, उपाध्यक्ष अशोक पाटील, उपाध्यक्ष आप्पा कांबळे, उपाध्यक्ष माणिक शिंपले, लक्ष्मण आखडमल,  संजय मेखले, उपाध्यक्ष इंद्रकुमार विश्वकर्मा, संतोष ताम्हणकर, सचिन जाधव, प्रमोद निपुरते, पांडुरंग दयाळ, के. टी. सुतार सर, मोहिते सर, सदाशिव मदने , तीपय्या बाईकडी, सुरेंद्र यादव, साळुंखे सर, राजेंद्र पवार, शोभा गरांडे, निस्सार पटेल, सत्तार खान, लहू कोकणे, विजय सिंग, नीता पथाडे, स्मिता चेट्टीयार यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकाऱयांचा समावेश आहे.