मी राष्ट्राध्यक्ष असतो तर इराणची एवढी हिंमतच झाली नसती; डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया

अमेरिकेत या वर्षात राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता प्रत्येक ठिकाणी संधी मिळेल तेव्हा माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना लक्ष्य करत आहेत. इराणे इस्रायलवर केलेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना ट्रम्प यांनी पुन्हा एकदा बायडेन यांच्यावर निशाणा साधला. इराणने केलेल्या हल्ल्याचा निषेध त्यांनी केला आहे. तसेच आपण राष्ट्राध्यक्ष असतो तर असा हल्ला करण्याची इराणची हिंमतच झाली नसती, असा दावाही त्यांनी केला आहे.

इस्रायलवर इराणने हल्ला केला आहे. हा हल्ला निषेधार्ह असून असे व्हायला नको होते. आपण राष्ट्राध्यक्ष असतो तर असा हल्ला करण्याची इराणची हिंमत झाली नसती, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. इराणे इस्रायवर सुमारे 300 मिसाइल डागले. या हल्ल्यानंतर अमेरिका इस्रायलसोबत असल्याचे तसेच इस्रायलच्या रक्षणासाठी सज्ज असल्याचे जो बायडेन यांनी सांगितले. बायडेन यांच्या या संदेशावरही ट्रम्प यांनी टीका केली आहे. त्यांचे हे संबोधन रेकॉर्डेड असल्याचे त्यांनी सांगितले. ही वेळ रेकॉर्डेड संबोधन करण्याची नसून ठोस कृती करण्याची असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.