‘इश्कबाज’ फेम अभिनेत्री लग्नबंधनात अडकली, मराठमोळ्या प्रियकरासोबत सप्तपदी घेतली

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्रेनू पारीख (Shrenu Parikh) लग्नबंधनामध्ये अडकली आहे. श्रेनूने मराठमोळा प्रियकर अक्षय म्हात्रेसोबत (Shrenu Parikh) सप्तपदी घेतली आहे.

गुरुवारी 21 डिसेंबर रोजी वधु-वराकडील कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या साक्षीने दोघांनी एकमेकांच्या गळ्यात माळ घातली. श्रेनूचे मूळ गाव वडोदरा येथे हा विवाहसोहळा पार पडला.

नवदांपत्याने आपल्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.

फोटोंमध्ये दोघेही खुपच सुंदर दिसत आहेत. या फोटोंसोबत श्रेनूने ‘टेकन फॉरेव्हर’ असे कॅप्शन आणि लग्नाची तारीख ’21 डिसेंबर’ लिहिली आहे.

नववधुच्या पोषाखामध्ये श्रेनूने लक्ष वेधून घेतले असून तिने मरून आणि ऑरेंज सिक्वेन्स लेहंगा, तसेच पारंपारिक दागिने घातलेले आहेत. तर अक्षयने किरमिजी रंगाची शेवानी आणि पांढरी पगडी घातली आहे.

दरम्यान, श्रेनू पारीख ही छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘इश्कबाज’ या मालिकेमध्ये तिने गौरीची भूमिका साकारली होती. यामुळे ती घराघरात पोहोचली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shrenu Parikh (@shrenuparikhofficial)

‘एक भरम सर्वगुण संपन’, ‘इस प्यार को क्या नाम दूं – एक बार फिर’, ‘घर एक मंदिर’ आणि ‘जिंदगी का हर रंग…गुलाल’ या सारख्या प्रसिद्ध मालिकांमध्येही तिने काम केले आहे. तर अक्षय म्हात्रेने ‘पिया अलबेला’ आणि ‘इंडियावाली माँ’ मालिकेत काम केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Mhatre (@akshaymhatre11)