शाहरूख खानच्या “जवान”चा प्रीव्ह्यू रिलीज

पठाण या वादग्रस्त चित्रपटानंतर शाहरूख खान याचा “जवान” नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी घेऊन येत आहे. या चित्रपटात शाहरूख वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. किंग खानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून याचा प्रीव्ह्यू मैं कौन हूँ? कौन नहीं मैं पुण्य हूँ या पाप हूँ?… मैं भी आप हूँ… अशा कॅप्शन सहीत शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

 

प्रीव्ह्यूच्या सुरूवातीला शाहरूखच्या आवाजात “मैं कौन हूँ? कौन नहीं, पता नहीं, मां को किया वादा हूं| या अधूरा एक इरादा| मैं अच्छा हूँ| बुरा हूँ| मैं पुण्य हूँ या पाप हूँ?… ये खुद से पुछना क्योंकी मैं भी आप हूँ…| रेडी नाम तो सुना होगा|” अशी सुरूवात होते. या प्रीव्ह्यू मध्ये विजय सेतुपति, नयनतारा, आणि दिपिका पादुकोण देखील अॅक्शन सिक्वेंस करताना दिसत आहेत. चित्रपटामध्ये दिपिकाचा गेस्ट अपीअरंस असणार आहे. प्रिव्ह्यूमध्ये शाहरूखचे वेगवेगळे लूक पाहायला मिळतात. शेवटी बेकरार करके हमे यू ना जाईए या गाण्यावरचा शाहरूखचा अभिनय या प्रिव्ह्यूला अधिक रंजक बनवते.

तमिळ चित्रसृष्टीतील नावाजलेले नाव अॅटली कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट हिंदीसहीत, तामिळ, तेलगू या भाषांमध्ये देखील 7 सप्टेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.