लातूर जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, वीज पडून दोन युवकांचा मृत्यू

लातूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज अवकाळी पावसाने दाणादाण उडविली आहे. चाकूर तालुक्यातील मौजे महाळंगी येथे तर अवकाळीचे तांडवच होते. गावातील सुमारे 20 पेक्षा अधिक विद्युत पोल जमिनदोस्त झाले तर मुख्य लाईन वरील सुमारे 15 पोल उखडले गेले आहेत. अनेक झाडे पडली. घरावरील पत्रे पतंग उडाल्याप्रमाणे उडाले. लातूर तालुक्यातील मौजे तांदूळजा परिसरात मोठे नुकसान झाले आहे. निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी परिसरात ही नुकसान झाले आहे. वीज पडून दोन युवकांचा मृत्यू झाला आहे.

लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील मौजे वडवळ नागनाथ, जानवळ, महाळंगी आणि परिसरात अवकाळी चे तांडव पहाण्यास मिळाले. अनेक घरावरील पञे उडाली, झाडे उन्मळून पडली. चाकूर तालुक्यातील महाळंगी येथील शिवारात रविवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास शेतात काम करत असताना वीज पडून दोन तरुण शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे . तर आवकाळी वादळ सुटल्याने अनेक झाडे ,विद्युत पोल घरावर पडल्याने लांखोचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे . याबाबत अधिक माहिती अशी की,महाळंगी येथील शिवारातील शिवाजी नारायण गोमचाळे वय 32 वर्ष हे स्वताच्या शेतात मशागतीचे काम करत असताना अचानक वादळी वा-यासह अवकाळी पावसास सुरूवात झाली .शेतशेजारी ओमशिवा लक्ष्मण शिंदे वय 30 वर्ष हेही गोमचाळे यांच्या शेतात आले.हे दोघे झाडाखाली बसले होते परंतु जोरात सुसाट्याचा वारा सुटल्याने झाड हलु लागल्यामुळे ते उघड्या रानात जाऊन थांबले असता वीज पडली त्यात शिवाजी गोमचाळे व ओमशिवा शिंदे यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी 4.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे .दरम्यान जानवळ येथील घरावरील वादळामुळे अनेकांच्या घरावरील लोखंडी पञे उडून गेले आहेत .तर वडवळ (ना.)येथे विजेचे तीन खांब पडले असून तारा रस्त्यावर पडल्या असल्याने विद्युत प्रवाह खंडीत झाला होता.माञ जानवळ व वडवळ येथे जीवीतहाणी झाली नसल्याची माहिती मिळते.महाळंगी येथे या वादळी वा-यामुळे अनेकांच्या घरावर झाडे ऊनमळून पडले असून घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .तसेच विद्युत खांबे पडली असून तारा तुटल्या आहेत .तर गोमचाळे व शिंदे यांच्या वर किनगाव येथील शासकीय ग्रामीण रूग्णालयात श्वविचेदन करण्यात आले असून किनगाव पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे .तर तालुक्यात वीज पडून दोन तरूण शेतकऱ्यांच्या मृत्यू झाला माञ तहसीलदार नरसींग जाधव यांना याबाबत संपर्क केला असता मी घटनास्थळी गेलो नाही मंडळअधिकारी व तलाठी यांना पाठविल्याचे सांगितले . यामुळे नागरिकांत नाराजी पसरली आहे .

तालुक्यातील मौजे शिवनखेड बु. येथे रविवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे प्रभू रामा कोंपले या शेतकऱ्याची म्हैस अंगावर बाभळीचे झाड पडल्यामुळे मृत्यू झाली आहे. तर झरी खुर्द येथील तरुण शेतकरी गणेश सूर्यवंशी यांची दोन एकर केळी बाग चक्रीवादळामुळे भुईसपाट झाली आहे .

रेणापूर तालुक्यातील पानगाव मध्ये चक्रिवादळा सह पाऊसाच सुरुवात झाली .चार वाजून तिस मिनिटा पासुन आर्धा तास वारा व पाऊस चालू होता त्या मध्ये तब्बल शंभर वर्षा पुरवी चे वडाचे झाड कोसळले जिवितहाणी झाली नाही. वादळी वारा ,जोराचा पाऊस यामुळे आज साधारण 5 वा सुमारास तांदुळजा शिवारात झाडे उन्मळून पडले तर काही शेतकऱ्यांच्या शेतातील सोलार पंपाच्या प्लेट विहरीत कोसळून अतोनात नुकसान झाले आहे . औरादसह परीसराला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले अनेक लोकांच्या घरावरील व गोट्यावरील पत्रे उडाले. औराद शहाजानी येथील शेतकऱ्यांच्या हाताशी आलेली आंब्याचे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने नुकसान झाले. तगरखेडा ता.निलंगा येथील मोहन गणपतराव मुळजे यांचे घरावरील चार पत्रे वादळी वाऱ्याने उडाली आहे.

अवकाळी लातूर जिल्ह्यातील आज झालेले नुकसान 

चाकुर तालुका

मौजे मौजे महाळंगी ता.चाकुर येथे आज अंदाजे दुपारी चार वाजता वीज पडून शिवाजी नारायण गोमचाळे अंदाजे वय 35 वर्षे व ओम  लक्ष्मण शिंदे अंदाजे वय 30 वर्षे याचा मृत्यू झाला आहे
मौजे शिवनखेड तालुका चाकूर येथील श्री प्रभू रामा कोपले यांची म्हैस झाडाखाली बांधली असता वीज कोसळून मयत झाली आहे.

निलंगा तालुका

पानचिंचोली तालुका निलंगा येथील बळीराम व्यंकट हणमंते वय 35 यांच्या अंगावर आंब्याचे झाड पडुन ते मयत झाले आहेत त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले व वडील आहेत.
मौजे शेळगी तालुका निलंगा येथील शेतकरी दत्तात्रय गोविंद रोडे यांची  म्हैस विज पडून मयत झाली आहे.

शिरूर अनंतपाळ तालुका

मौ.हालकी ता. शिरूर अनंतपाळ येथे आज दिनांक 26.5.2024 रोजी ठीक पाच वाजता श्री गंगाधर माधवराव बामनकर यांची एक म्हैस वीज पडून मयत झाली

लातूर तालुका

मौ.तांदुळजा तालुका लातूर येथे वीज पडून ईश्वर सराफ यांची एक म्हैस आणि मौजे काटगाव (कृष्णानगर तांडा) तालुका लातूर येथील विठ्ठल राठोड यांची म्हैस विज पडून मयत झाली आहे.