शिक्षक सेनेचा दणका, अल्पसंख्याक शिक्षण संस्थांच्या समस्यांबाबत शिक्षण सचिवांकडे बैठक

अल्पसंख्याक शिक्षण संस्थेवर होत असलेल्या अन्यायाची दाद मागण्याकरिता महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने मुंबईतील तिन्ही शिक्षण निरीक्षक कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. शिक्षक सेनेने केलेल्या मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी उद्या गुरुवारी शालेय शिक्षण सचिव रणजितसिंह देओल यांच्यासोबत बैठक होणार आहे.

राज्य शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले. आज शिक्षण निरीक्षक देविदास महाजन त्याचबरोबर अधीक्षक अनिल दहिफळे, र. गु. परदेशी वेतन विभाग यांनाही मागण्यांचे निवेदन देण्यात आले. अल्पसंख्याक संस्थेतील शिक्षकांच्या नियुक्तीवर लादण्यात आलेली बेकायदेशीर, घटनाबाह्य व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतारणा करणारी नियुक्तीवरील बंदी, अल्पसंख्याक संस्थेतील वाढीव पदावर कार्यरत असलेल्या शिक्षकांचे समावेशन, बिगर अल्पसंख्याक संस्थेमध्ये म. खा. शा. क. सेवाशर्ती नियमावली 1981 मधील नियम क्र. 26 व 27 प्रमाणे करण्यात यावे आदी विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात मुंबई विभाग अध्यक्ष अजित चव्हाण, मुकेश शिरसाठ (प्रादेशिक सचिव), विभागप्रमुख वडाळा विलास राणे, प्रमोद मोरजकर, झियाऊद्दीन काझी, मंगेश पाटील,  राजेंद्र घाडगे, प्रमोद वाघ, दिनेश शर्मा, दिलीप पाचांगणे, अक्रम सर, हितेंद्र चौधरी, मोहम्मद कुरेशी, अनुश्री घोगरे, स्मिता मॅडम, श्रीणुन शेख मॅडम, शशिकांत राजपूत, सिद्धार्थ सावंत, निषाद अहमद, रघुनाथ पाटील, डी. एस, गायकवाड, संजय गडलिंग, जावेद शेख, संदीप कचोरे, मेहमूद कुरेशी, थम्बन नायर, अविद अन्सारी, सुजाता विश्वासराव, वसंत पवार उपस्थित होते.