महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप! अजित पवार राजभवनात दाखल

राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. यासाठी अजित पवार 30 ते 40 आमदारांसह राजभवनात दाखल झाले आहेत.

अजित पवार विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजित पवारांकडे जवळपास 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगण्यात येत आहे. राजभवनाकडे शासकीय गाडी न वापरता खासगी वाहनाचा वापर केला आहे. छगन भुजबळ आणि अजित पवार यांच्यासह 7 आमदार आज शपथ घेण्याची शक्यता आहे.