लॉरेन्स बिष्णोईच्या नावाखाली प्रँक कॉल करणारा अटकेत

गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या नावाखाली प्रँक कॉल करणाऱयाला वांद्रे पोलिसांनी अटक केली. रो हित त्यागी असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. टीव्हीवर सलमानबाबत वारंवार बातम्या येत असल्याने प्रँक करण्यासाठीच त्याने पह्न केल्याचे तपासात समोर आले आहे.

गेल्या आठवडय़ात अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला होता. वृत्तवाहिन्यांवर सलमान खान गोळीबार प्रकरणात बातम्या दाखवल्या जात होत्या. गोळीबार प्रकरणात पोलिसांनी तपास करून दोघांना भुज येथून अटक केली. अटकेनंतर सलमानच्या घराबाहेर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला. दोन दिवसांपूर्वी एका खासगी टॅक्सी पंपनीच्या कॉल सेंटरमध्ये पह्न आला. पह्न करणाऱयाने त्याचे नाव लॉरेन्स बिष्णोई असे सांगितले. गॅलेक्सी अपार्टमेंट ते वांद्रे पोलीस ठाणे असे जायचे सांगून टॅक्सी बुक केली. ठरल्यानुसार टॅक्सी चालक हा गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ आला. त्याने तेथील सुरक्षा रक्षकाला लॉरेन्स बिष्णोई नावाच्या व्यक्तीचे टॅक्सी बुकिंग असल्याचे सांगितले. सुरक्षा रक्षकाने याची माहिती वांद्रे पोलिसांना दिली.

अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद झाल्यावर अतिरिक्त पोलीस आयुक्त परमजित सिंह दहिया यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. परिमंडळ-9चे पोलीस उपायुक्त राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक संजय मराठे याच्या पथकातील अधिकाऱयाने तपास सुरू केला. तपासा दरम्यान उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथून पोलिसांनी रोहितला ताब्यात घेतले. रोहित हा महाविद्यालयात शिकतो. सलमान खान प्रकरणात पोलीस तपास करतात हे वृत्तवाहिन्यांवर वारंवार दाखवले जात होते, त्यामुळे त्याने तो प्रँक कॉल केल्याचे समजते.