त्यांना जातीय दंगली घडवायच्यात, मनोज जरांगे-पाटील यांचा छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिंदे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ आणि मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. याच दरम्यान मनोज जरांगे-पाटील यांनी छगन भुजबळ यांना राज्यात जातीय दंगली घडवायच्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. शनिवारी सकाळी त्यांनी प्रिती संगमानवर यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले. यानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते.

ज्यांनी 30-35 वर्ष या राज्यात घटनात्मक पद सांभाळले, मंत्री म्हणून काम केले, त्या व्यक्तीचे एवढे भयान विचार होते हे आज बाहेर आले. इथून मागे त्यांनी जनतेचे किती हात केले असतील हे समोर आले. उशीरा का होईना पाप बाहेर पडले, अशा शब्दात मनोज जरांगे-पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली.

वैचारिक मतभेद असले तर काही नाही, पण व्यक्तीगत मनभेद नको. आता ते पातळी सोडल्यामुळे ओबीसींसह मराठा समाजाच्या नजरेतून उतरले आहेत. जातीय दंगली घडवण्याचा त्यांनी कट रचला होता आणि त्यांची महत्त्वाकांक्षा काय आहे हे ओबीसी बांधवांसह जनतेच्या लक्षात आले. त्यांना मुख्यमंत्री व्हायचंय आणि त्यासाठी जातीय दंगली घडवायच्या आणि गोरगरिबांच्या, ओबीसी बांधवांची लेकरी गुंतवायची, असा आरोप जरांगे-पाटील यांनी केला.

भुजबळांचे बोलणे बंद करा, अन्यथा आमचा नाइलाज होईल! मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

70 वर्षांचा बॅकलॉग कसा भरून काढणार?

दरम्यान, सातारा येथे सभेला संबोधित करताना मनोज जरांगे-पाटील यांनी सरकारलाही धारेवर धरले. 70 वर्षांपासून पिढ्या बरबाद झाल्या. आरक्षण असतानाही आरक्षण मिळाले नाही. मराठे कुणबी नाही म्हणता मग आता कशा नोंदी सापडल्या? 70 वर्षांचा आमचा बॅकलॉग सरकार कसा भरून काढणार आहे? असा सवाल जरांगे पाटील यांनी केला.