Manipur violence: मणिपुरमध्ये पुन्हा हिंसाचार, अंदाधुंद गोळीबारात दोन जणांचा मृत्यू

मणिपुरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार सुरुच असून मंगळवारी तिथे अंदाधुंद गोळाबीर झाला. या दरम्यान दोनजणांचा मृत्यू झाला आहे. यावेळी भाजपचा माजी युवा अध्यक्षासह पाच जणं जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांकडून मिळआलेल्या माहितीनुसार, मृतकांच्या संख्येत वाढ होऊ शकते.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, अधिकृत सुत्रांचा हवाला देत सांगितले की, गोळीबार मंगळवारी दुपारी साधारण अडीजच्या सुमारास सुरु झाला होता आणि तो बरेच तास सुरु होता. या गोळीबारात मारल्या गेलेल्या दोन लोकांची ओळख पटली असून नोंगथोम्बम मायकल (33) आणि मीस्नाम खाबा (25) अशी त्यांची नावे आहेत. दोघांचा मृतदेह 30 जानेवारी रोजी सायंकाळी रीजनल इंस्टिट्यूट ऑफ मेडीकल सायसेंस ला नेण्यात आले.पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंफालच्या पश्चिम जिल्ह्यातील कौटुक गावात हा गोळीबार झाला. गोळीबारानंतर एक व्यक्ती बेपत्ता असल्याचे कळले आहे. हिंसाचारा दरम्यान भाजपचे युश प्रेसिंडेण्ट राहिलेले बरिश शर्मा देखिल जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आहे.

मणिपुर पोलिसांनी सांगितले की, इंफाल पश्चिम आणि कांगपोकपी जिल्ह्याच्या सिनेवर दोन समुदायांच्या ग्रामस्थांमध्ये गोळीबार झाला. त्या हिंसेनंतर इंफाल घाटीचे कडांगबंद, कौटुक आणि कांगचूप गावातील लोकं जीव वाचविण्यासाठी पळून गेल्याच्या बातम्या आहेत. वृत्तपत्राच्या अहवालात असेही सांगण्यात आले आहे की, मणिपूरमध्ये गेल्या एका महिन्यात उसळलेल्या हिंसाचारात किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचारग्रस्त भागात तैनात असलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांचाही मृत्यू झालेल्यांमध्ये समावेश आहे.

गेल्या वर्षी 3 मे 2022 रोजी राज्यात सुरू झालेल्या हिंसाचारात 180 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि 3000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. हिंसाचारामुळे हजारो लोकही विस्थापित झाले होते, तर राज्यात किमान 60,000 केंद्रीय सुरक्षा दलाचे कर्मचारी तैनात असूनही आठ महिन्यांहून अधिक काळ हिंसाचाराच्या घटना घडत आहेत.