भुजबळच ओबीसींचे आरक्षण संपवायला निघालेत, मराठा समाजाचा समाजाचा आरोप

मराठा समाजाबद्दल जो आकस आहे तो ओबीसीच्या मेळाव्यातून मंत्री भुजबळ यांच्यामार्फत दिसून आला आहे. भुजबळच ओबीसींचे आरक्षण संपवायला निघाले आहेत, असा आरोप सकल मराठा समाजाचे गजेंद्र दांगट व गोरख दळवी यांनी केला असून भुजबळांचा बोलवते धनी हे देवेंद्र फडणवीस आहेत, असं सांगून मराठा प्रस्थापितांकडेच ओबीसीचे सर्टिफिकेट आहे. हेच मराठा घराणेशाही करत असल्याने मराठा समाजाचे नुकसान झाले आहे आता हे सर्व मराठा आमदार पडले तरी चालतील, मात्र आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाही अशी आमची भूमिका असल्याचेही ते म्हणाले.

काल मंत्री छगन भुजबळ यांची नगर येथे सभा झाल्यानंतर त्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी राम जरांगे, परमेश्वर पाटील, शशिकांत भामरे, स्वप्निल दगडे आदि यावेळी उपस्थित होते. गजेंद्र दांगट म्हणाले की, काल झालेला ओबीसी मेळावा हा मराठा द्वेष करण्यासाठी बोलवला होता असे दिसून आले, फक्त मराठा समाजावर बोलायचे असा त्यांचा एकच कार्यक्रम यांचा सुरू होता. ज्या लक्ष्मण हाके नां त्यावेळेला विधानसभेला अवघी 200 मते पडली त्यांनी आमच्या जरांगे पाटलावर बोलू नये असे ते म्हणाले. तर बारामती मतदारसंघातून गोपीचंद पडळकर हे सर्वाधिक जास्त मताने पडले व त्यांचे डिपॉझिट जप्त झाले हा इतिहास आहे. त्यामुळे त्यांचे सुद्धा अस्तित्व काय आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. भुजबळांचा इतिहास हा पक्ष बदलण्याचा व कोलांटी उडी मारण्याचा आहे असा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केला.

माळी समाजाच्या व्यतिरिक्त एकाही ओबीसींच्या जातीचा मराठ्यांना आरक्षण देण्याचा विरोध नाही. फक्त माळी समाजच विरोध करतोय अशी भूमिका भुजबळ यांनी जाहीर भाषणातून सुद्धा व्यक्त केलेले आहे.आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मागत आहे असेही ते म्हणाले. सध्याची सरकार जी जनगणना करत आहे ती अतिशय बोगस पद्धतीने करत आहे. वास्तविक पाहता त्यानी जातीनिहाय जनगणना केली पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचेही ते म्हणाले. मराठा समाजातील गरीब माणसांना त्रास देण्याचा प्रकार सध्या सर्वत्र सुरू आहे. समाजामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. यांचा बोलबोलावतातो धनी हा दुसराच आहे. हे सगळ्यांना माहित आहे. यांनी काल भाषणातून नाभिक समाजाने बहिष्कार टाका असे वक्तव्य केले जरांगे पाटील चांगले नेते आहेत. मग हे संविधानाच्या विरोधात नाही का आता सरकारने त्याच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी असल्याचेही दांगट यांनी म्हटले आहे.

तर गोरख दळवी यांनी सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही ते वेळ काढून पणा करत आहे. त्यांना प्रस्थापित मराठी चालतात मात्र गरीब मराठा का चालत नाही असा आमचा सवाल असल्याचे ते म्हणाले.जो गरीब समाज पोटासाठी शिक्षणासाठी आरक्षण मागतो त्याला ते दिले जात नाही. ज्यांच्याकडे चार चाकी गाड्या आहेत धनदौलत आहे अशांना सर्व सुविधा मिळतात ही बाब अतिशय गंभीर आहे. यांना फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी आरक्षण पाहिजे आहे असे ते म्हणाले. जर भुजबळने राजीनामा दिला असे ते काल म्हणाले मग त्यांनी सरकारी गाडी व संरक्षण का घेतले असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला. भुजबळांचा बोलता धनी हे फडणवीस असल्याचेही ते म्हणाले भुजबळणी या अगोदर कधी माळी समाजासाठी किंवा अन्य ओबीसीसाठी कधी आंदोलन केले नाही कधी रस्त्यावर उतरले नाही फक्त स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी त्यांनी ओबीसी समाजाचा वापर केला. आता हेच सगळेजण ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आणण्यासाठी पुढे आले आहेत की काय अशी आमच्यामध्ये शंका असल्याचे त्यांनी सांगितले. यांना आमच्याबद्दल द्वेष आहे यांना मराठ्यांवर तोंडसुख घ्यायचे आहे . जाती जातीमध्ये यांना भांडणे लावायची आहेत, अशा प्रकारे आता हे बोलत आहेत. वास्तविक पाहता मराठा समाजामध्ये जे प्रस्थापित पुढारी आहे ते सुद्धा या मराठा समाजाला आरक्षण मिळू नये अशा भूमिकेत आहे. त्यामुळे आता अशांना सुद्धा आता टार्गेट केले पाहिजे वेळप्रसंगी 148 आमदार पाडा ही सुद्धा आमची भूमिका असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जरांगे पाटील यांच्यासारखा माणूस समाजाला बऱ्याच वर्षानंतर आंदोलनाच्या माध्यमातून मिळाला आहे. पण अशांवर टीका करून समाजाच्या भावना दुखण्याचा प्रकार सध्या यांच्याकडून सुरू आहे आज सत्तेमध्ये अजितदादा पवार हे भाजपा जवळ गेल्यामुळे गोपीचंद पडळकर यांचे महत्त्व कमी झाले आहे. त्यामुळे आता त्यांना काही ना काही मराठा समाजावर बोलल्याशिवाय त्यांची पोळी भाजली जाणार नाही. वास्तविक पाहता ते धनगर समाजाचे आहेत त्या धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ते का भांडत नाही. एकंदरीतच या सरकारमध्ये झालेली महायुती अभद्र आहे. कोण कोणाचा कधी वापर करतो हे सुद्धा कळत नाही व नेमके काय निर्णय घ्यायचे हे यांना कळत नाही असा टोला सुद्धा त्यांनी यावेळी लगावला.

त्यांनी नाही सर्वसामान्यांनी मदत केली….
मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला मुंबईकडे जात असताना जे प्रस्थापित मराठी किंवा लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे आम्हाला अनेक वेळेला जावे लागले बोटावर मोजणाऱ्या एक दोन जणांनी अनेक वेळेला विनंती केल्यावर मदत केली मात्र आम्ही त्यांच्या भरोशावर न थांबता सर्वसामान्य मराठा समाजाने आपल्या बांधवांसाठी काहींना काही मदत साठी हात पुढे केला व आम्ही त्या रॅलीला मदत केली असे गोरख दळवी यांनी सांगितले.

सत्तेमधील कोण आहे याची आम्हाला परवा नाही

मराठा आरक्षण हा विषय सर्वसामान्य मराठ्यांच्या आरक्षणाचा मुद्दा आहे सरकारमध्ये बसलेले तीनही महायुतीतील नेते हे या आरक्षणाला वेळ काढून पणा करत आहे व त्यानंतर भुजबळ हे याला विरोध करत आहे जर भुजबळ यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला असे सांगतात मग ते सरकारी भत्ते कसे घेतात असा आमचा सवाल आहे. भुजबळ ही कटपुतली आहे असा आरोप सुद्धा त्यांनी केला. यांनी जाती सर्वेक्षणाच्या बाबत मंत्रिमंडळामध्ये काय विरोध केला नाही असेही ते म्हणाले