बनावट गुणपत्रिका प्रकरणी मुंबई विद्यापीठाने दाखल केली तक्रार

बनावट गुणपत्रिका प्रकरणी मुंबई विद्यापीठाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. विद्यापीठाची गुणपत्रिका 10 ते 12 हजारात घरी बसून मिळेल, अशी जाहिरात काही दिवसांपूर्वी फेसबुक या समाज माध्यमावर आली होती. त्यानंतर पुणे येथील एका व्यक्तीनी ती जाहिरात पाहून, त्याने काही रक्कम दिल्यानंतर त्या व्यक्तीच्या व्हॉटसअॅप वर एक बनावट गुणपत्रिका मिळाली, याची विद्यापीठांनी गंभीर दखल घेऊन मुंबईतील बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

जाहिरातीतील पह्नवर एका व्यक्तीशी संपर्क केला असता त्याने 2000 रुपये अॅडव्हान्स मागितले, अॅडव्हान्स रक्कम भरल्यानंतर त्याच्या व्हॉटसअॅपवर मुंबई विद्यापीठाची बीएससीची एक कथित बनावट गुणपत्रिका प्राप्त झाली. विद्यापीठाने केलेल्या या पोलीस तक्रारीत सदर प्रकारची बाब समाजाची दिशाभूल व आर्थिक फसवणूक करणारी असून मुंबई विद्यापीठाची प्रतिमा मलीन करणारी आहे. तरी या प्रकरणाशी संबंधित असणाऱयांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, जेणेकरून वरील प्रकारच्या बाबींना आळा बसण्यास मदत होईल, अशा आशयाची लेखी तक्रार केली आहे.