नगर अर्बन बँक कर्ज घोटाळाः आज, उद्या महत्त्वपूर्ण सुनावणी

nagar-urban

अर्बन बँक बोगस कर्ज प्रकरण घोटाळ्यात दिवसेंदिवस नवीन माहिती समोर येत आहे. शेकडो आरोपी असलेल्या या घोटाळ्याने 109 वर्षे जुनी बँक बंद पडली. यामुळे बँकेत ठेवलेल्या ठेवीदारांच्या ठेवी अडकून पडल्या आहेत, तर कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार आहे. या बोगस कर्जप्रकरणी उद्या आणि मंगळवारी होणारी सुनावणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दरम्यान, संचालक, कर्जदार आणि ज्यांचा आतापर्यंत काहीही सहभाग दिसत नव्हता, त्यांनीही अटकपूर्व जामीन ठेवल्याने घोटाळ्यातील सस्पेन्स वाढू लागला आहे. तसेच आरोपींची यादी कोणी लीक केली? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

संगमनेर येथील अटकेत असलेले अमित पंडित यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी युक्तिवाद होणार आहे, तर राजेंद्र लुणिया, कर्जदार प्रवीण लहारे, कर्जदार अविनाश वैकर यांच्या जामीन अर्जावर उद्या युक्तिवाद होणार आहे. संचालक कमलेश गांधी यांनी अटकपूर्व जामीन ठेवला असून, निवृत्त वरिष्ठ अधिकारी एम. पी. साळवे, नवीन गांधी, सतीश शिंगटे, सतीश रोकडे यांच्या अटकपूर्व जामिनावरही उद्या युक्तिवाद होणार आहे.