नितीश म्हणाले, मोदी पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत!

‘नरेंद्र मोदी पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत अशी माझी मनापासून इच्छा आहे’, असे विधान बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी पाटणा साहिब येथे जाहीर प्रचारसभेत केले आणि व्यासपीठावरील भाजप नेत्यांची चांगलीच गोची झाली.

पेंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत नितीशकुमार मोदींवर स्तुतीसुमने उधळत होते. त्यात मोदी पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे नितीश म्हणताच रविशंकर प्रसाद यांच्यासह व्यासपीठावरील नेते नितीश यांच्याकडे सरसावले. मुख्यमंत्री नाही, पंतप्रधान म्हणा असे या नेत्यांनी सांगितले तेव्हा पंतप्रधान तर मोदी आहेतच, असे म्हणत नितीश यांनी आपले भाषण पुढे नेले.