मुंबईचा धोका वाढला, जिनोम सिक्वेंसिंगमध्ये 55 टक्के ओमायक्रोन 

फाईल फोटो

मुंबईत दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असताना ओमायक्रोनने चांगलेच हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात झालेल्या 282 चाचण्यांमध्ये तब्बल 55 टक्के रुग्ण झपाटय़ाने पसरणाऱ्या ओमायक्रोनचे असल्याचे समोर आले आहे. शिवाय या अहवालात 13 टक्के रुग्ण डेल्टाचे आणि सौम्य असणाऱ्या ‘डेल्टा डेरिक्हेटीक्ह’चे 32 टक्के रुग्ण असल्याचे अहवालातून समोर आले आहे. यामध्ये डेल्टा डेरिव्हेटिव्हने एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. 60 वर्षे वयाच्या या रुग्णाला मधुमेह आणि हायपरटेन्शचाही त्रास होता.

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असल्याने ओमायक्रोन रुग्णांची संख्याही वाढू लागल्याने मुंबईचे टेन्शन वाढले आहे. ओमायक्रोन रुग्णांची संख्या वाढू लागल्याने सर्व कोरोनाबाधितांची  जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त पालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या निर्देशानुसार नियमितपणे चाचण्या केल्या जात आहेत. याअंतर्गत सातक्या चाचणी अहवालात मुंबईतील 282 रुग्णांमधील कोकिड किषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला असून त्याचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले आहेत. यात ‘डेल्टा व्हेरिएंट’ चे 13 टक्के, ‘डेल्टा डेरिक्हेटिक्ह’ चे 32 टक्के तर ‘ओमायक्रॉन’ चे 55 टक्के रुग्ण आढळले आहेत. पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्केन्सिंग लॅब क पुणेस्थित राष्ट्रीय किषाणूकिज्ञान संस्था यांच्या संयुक्त किद्यमाने या सातक्या चाचणीचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये एकूण 376 रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यातील 282 रुग्ण हे मुंबई महानगरातील नागरिक आहेत. त्यामुळे या 282 नमुन्यांसंदर्भातील निष्कर्ष देण्यात येत आहेत.

चाचणी अहवालाची वैशिष्टय़े

ओमायक्रोन विषाणू बाधा झालेल्या 156 पैकी फक्त नऊ जणांनाच रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी कोणालाही लक्षणे आढळली नाहीत. यासोबत त्यांना प्राणवायू पुरवठा किंवा अतिदक्षता विभागातही दाखल करावे लागले नाही.

कोकिड लसीकरण निकष लक्षात घेता 282 पैकी फक्त 17 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यापैकी पहिला डोस घेतलेले फक्त तीन जण रुग्णालयात दाखल. दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी अवघे 10 जण रुग्णालयात दाखल. लसीचा एकही डोस न घेतलेल्या 81 पैकी चार जण रुग्णालयात दाखल.

डेल्टा डेरिव्हेटिव्हबाधित दोघांनाच अतिदक्षता उपचारांची गरज भासली. यापैकी एका डेल्टा डेरिव्हेटिव्हबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. सदर व्यक्ती ही 60 वर्षेपेक्षा अधिक वयाची ज्येष्ठ नागरिक होती. त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. तसेच त्यांनी कोविड लसीचा फक्त पहिला डोस घेतला होता.

असे आहे वयोगटनिहाय वर्गीकरण

0 ते 20 वर्षे वयोगट  – 46 रुग्ण     (16 टक्के)

21 ते 40 वर्षे वयोगट – 99 रुग्ण          (35 टक्के)

41 ते 60 वर्षे वयोगट – 79 रूग्ण    (28 टक्के)

61 ते 80 वयोगट  – 54 रुग्ण            (19 टक्के)

81 ते 100 वयोगट – 4 रुग्ण      (1 टक्के)

बाधित रुग्णांचे वर्गीकरण

डेल्टा व्हेरिएंट           – 37 रुग्ण (13 टक्के)

डेल्टा डेरिव्हेटिव्ह      – 89 रुग्ण (32 टक्के)

ओमायक्रॉन   – 156 रुग्ण        (55 टक्के)