आजपासून भीमसेन जोशी संगीत महोत्सव

राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे 3 ते 5 फेब्रुवारीदरम्यान सायंकाळी 6 ते 10 वेळेत माटुंगा येथील यशवंत नाटय़मंदिर येथे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्राrय संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची सुरुवात उद्या संजीवनी भेलांडे यांच्या शास्त्राrय गायनाने होणार आहे. आशीष रानडे यांचे शास्त्राrय गायन, अंकिता जोशी, कलाकार रवी चारी यांच्या वाद्य संगीताचा कार्यक्रम, गायिका रागेश्री वैरागकर सादरीकरण करतील. रविवारी रमाकांत गायकवाड, मधुवंती बोरगावकर, उपेंद्र भट यांचे शास्त्राrय गायन, अभिजित पोहनकर यांच्या वाद्य संगीताची जुगलबंदी आणि गायिका सानिया पाटणकर यांच्या गायनाचा कार्यक्रम होईल. सोमवारी यश कोल्हापुरे, मृणालिनी देसाई यांचे सादरीकरण होईल. गायिका चंदल पाथ्रीकर यांचे गायन तर नंदिनी शंकर यांच्या वाद्य संगीताचे सादरीकरण होईल. अर्चिता भट्टाचार्य आणि मंजुषा पाटील यांच्या गायन सादरीकरणाने या समारंभाची सांगता होईल.