
अहमदाबाद विमान दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण होत आले असून नियमांनुसार वर्षभराच्या आत येणे बंधनकारक असलेला ‘एअर क्राफ्ट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो’चा (एएआयबी) अंतिम अहवाल अद्याप समोर आलेला नाही. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियाद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार गटासह सत्ताधारी नेत्यांवर हल्ला चढवला आहे. “अजितदादांच्या अपघात प्रकरणाचा अहवाल येऊ द्या, मग बोलू”, अशी सावध भूमिका घेणाऱ्यांना रोहित पवार यांनी थेट ‘सत्तेचे दलाल’ आणि ‘नमक हराम’ म्हणत जोरदार टीका केली आहे.
रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत अजितदादा गटासह सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. अहमदाबाद विमान दुर्घटनेला वर्ष पूर्ण होतंय. नियमानुसार एक वर्षाच्या आत एएआयबीचा अंतिम अहवाल येणं बंधनकारक असतं, परंतु अद्यापही अहवाल आलेला नाही! एएआयबीच्या तपासात क्रिमिनल अँगल नसतो, अहवाल वेळेवर येत नाही हे माहीत असूनही “अजितदादांच्या अपघात प्रकरणाचा अहवाल येऊ द्या, अहवालाची वाट बघूया”, असं जे म्हणतात ना ते सर्व फक्त आणि फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम आणि कृतघ्न लोकं आहेत. मैत्री, नातीगोती केवळ भाषणामध्ये बोलायला आहे का, प्रत्यक्षात मात्र काहीच नाही का? असा प्रश्न पडतो, असे रोहित पवार यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटनेला वर्ष पूर्ण होतंय. नियमानुसार एक वर्षाच्या आत AAIB चा अंतिम अहवाल येणं बंधनकारक असतं, परंतु अद्यापही अहवाल आलेला नाही! AAIB च्या तपासात क्रिमिनल अँगल नसतो, अहवाल वेळेवर येत नाही हे माहीत असूनही “अजितदादांच्या अपघात प्रकरणाचा अहवाल येऊ द्या, अहवालाची वाट… pic.twitter.com/c7y56v3M3s
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 11, 2026



































































