Jaipur-Mumbai express firing – ‘या’ कारणामुळं कॉन्स्टेबलचा गोळीबार, रेल्वे पोलिसांची माहिती

जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये सोमवारी सकाळी गोळीबार झाला. या घटनेमध्ये आरपीएफच्या सहाय्यक उपनिरीक्षकासह चौघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरपीएफ कॉन्स्टॅबल चेतन याला अटक केली आहे. प्रवाशांसोबत झालेल्या वादातून त्याने हा गोळीबार केल्याचे प्राथमिक वृत्त होते. मात्र यामागे वेगळेच कारण असल्याचे समोर आले आहे. पश्चिम रेल्वेच्या पोलीस आयुक्तांनी माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली आहे.

आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन याची तब्येत ठीक नव्हती. त्यामुळे त्याने स्वत:वरील नियंत्रण गमावले आणि वाटेत येईल त्याच्यावर गोळीबार केला. आधी त्याने आरपीएफचे एएसआय टिकाराम यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर प्रवाशांना गोळ्या घातल्या. त्याचा प्रवाशांसोबत वाद झाला नव्हता, अशी माहिती रेल्वे पोलीस आयुक्तांनी दिली.

जयपूर-मुंबई पॅसेंजरमध्ये (रेल्वे क्र. 12956) सकाळी साडे पाचच्या सुमारास गोळीबार झाला. कोच क्र. 5मध्ये हा गोळीबार झाला. यात आरपीएफच्या सहाय्यक उपनिरीक्षकासह चौघांचा मृत्यू झाला. चेतन असे आरोपी आरपीएफ कॉन्स्टेबलचे नाव आहे.

दरम्यान, बोरिवली स्थानकाजवळ पॅसेंजरमधून मृतदेह खाली उतरवण्यात आले आणि त्यानंतर शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. तसेच रेल्वे स्थानकावर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)