डोळ्याचे पारणे फेडणारा सहस्त्रकुंड धबधबा

उमरखेड तालुक्यात पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड धबधबा आहे. नांदेडपासून अंदाजे 100 कि.मी दूर असलेला हा धबधबा नांदेड- किनवट मार्गावर 5 किमी तर किनवटपासून 50 किमी अंतरावर आहे.

नदीचा प्रवाह एका मोठ्या खडकामुळे विभागलेला असल्याने धारा पडतानाचे दृश्य नयनरम्य आहे. पावसळ्यात धबधब्याला आणखीनच शोभा येते. हिरवाईने नटलेले डोंगर- दऱ्या , 30 ते 40 फुटांवरून कोसळणारा हा धबधबा, आणि पाण्याचा एकसुरी आवाज अत्यंत आल्हाददायक वाटतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटक आवर्जुन इथे येतात. धबधब्या शेजारी पर्यटकांसाठी बगीचा बांधण्यात आला आहे. तसेच तेथे पंचमुखी महादेवाचे मंदिर देखील आहे. धबधब्यासोबत आणखीही काही स्थळांना भेट देता येऊ शकते. माहूर येथील रेणुकामाता, दत्त शिखर, अनसूया मातेचे मंदिर या धार्मिक स्थळ पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमते.