परदेशी शिक्षणासाठी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीही परदेशी शिक्षणाकरिता शिष्यवृत्ती योजनेची मागणी होत होती. त्या मागणीला यश आले असून अल्पसंख्याकांच्या परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेबाबतचा शासन निर्णयही जाहीर झाला आहे. अल्पसंख्याक गटातील 27 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

दरवर्षी विविध अभ्यासक्रमातील 27 अल्पसंख्याक विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकणार आहेत. क्यूएस वर्ल्ड रँपिंगमधील 200 च्या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये पदव्युत्तर पदवी पीएचडी अभ्यासक्रमासाठी बिनशर्त प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू होणार आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी या अभ्यासक्रमांसाठी एकूण 10 शिष्यवृत्ती तर औषधी व जीवशास्त्र्ा, लिबरल आर्ट व ह्युमॅनिटीजसाठी प्रत्येकी 6; शेतकीसाठी तीन आणि कायदा व वाणिज्यसाठी दोन अशा या 27 शिष्यवृत्ती देण्यात येणार आहेत.