सांगलीतील 10 हजार युवतींना दिले जाणार स्वसंरक्षणाचे धडे

राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत जिह्यातील प्रत्येक तालुक्यात एक हजार याप्रमाणे एकूण 10 हजार मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. मुलींनी या प्रशिक्षणातून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रावीण्य मिळवावे, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुवर्णा पवार यांनी केले.

सांगली येथील श्रीमती चंपाबेन शहा महिला महाविद्यालयात मुलींना स्वसंरक्षणाचे धडे दिले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी प्राचार्य डॉ. एस. एन. खिलारे, प्राध्यापिका डॉ. सुजाता कराडे व डॉ. सुनीता बोर्डे, प्रा. डॉ. शोभा पवार, महिला व बाल विकास विभागाचे जिल्हा संरक्षण अधिकारी संजय चौगुले, विधी सल्लागार दीपिका बोराडे, अश्विनी माळी यांच्यासह विद्यार्थिनी मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.

सुवर्णा पवार म्हणाल्या, राज्यात राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम 3 ते 13 जुलै 2023 या कालावधीत राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या अनुषंगाने जिह्यातील सर्व महाविद्यालयांत मुलींसाठी तीन दिवसांचे स्वसंरक्षणाचे
प्रशिक्षण दिले जाणार असून, यामध्ये भारतीय स्त्र्ााr शक्ती संस्था, विद्यार्थी निधी ट्रस्ट व ऑल महाराष्ट्र थांग-ता-असोसिएशन यांचा सहभाग असणार आहे.

यावेळी महाराष्ट्र थांग-ता-असोसिएशनचे प्रशिक्षक व स्त्र्ााr शक्ती संस्थेच्या कल्याणी गाडगीळ यांनी व्याख्यान व प्रात्यक्षिकाद्वारे उपस्थित मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले. तसेच महिला व बाल विकास विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेली महिला व बाल विकास विभागाच्या योजना व कायद्यांची पुस्तिका भेट देण्यात आली