मोदी सरकार जनतेचे बँक खातेही गोठवेल! शरद पवार यांचा हल्ला

सत्तेचा वापर विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठी केला जात आहे. काँग्रेसचे बँक खातेसुद्धा या लोकांनी (मोदी सरकार) गोठवले, व्यवहार बंद केले. उद्या तुमचेही (जनतेचे) बँक खाते ते बंद करतील. एवढी टोकाची भूमिका या राज्यकर्त्यांची आहे. त्यामुळे या लोकांचा पराभव करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना शेतकऱयांच्या प्रश्नांची जाण नाही, असा हल्लाबोलही त्यांनी केला.

शरद पवार म्हणाले, ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. देशाचा कारभार कोणाच्या हाती असावा हा प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहे. कर्नाटकमध्ये एका मंत्र्याने संविधान बदलण्यासाठी मत द्या असे विधान केले. लोकशाहीमध्ये सत्तेचा वापर लोकांच्या हितासाठी केला पाहिजे, पण सत्तेचा वापर करून संविधानावर हल्ला होण्याची शक्यता असेल तर लोकांनी जागरूक राहिले पाहिजे. भाजपचे सरकार केंद्रात पुन्हा सत्तेवर आल्यास संविधान बदलण्याचा धोका आहे.

सत्तेचा वापर विरोधकांना तुरूंगात टाकण्यासाठी केला जात आहे. दैनिक ‘सामना’ मधून शिवसेना नेते संजय राऊत परखड लिहीतात, सरकारच्या चुकीच्या धोरणावर लिहितात म्हणून त्यांना तुरूंगात टाकले. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर कारवाई केली. पंतप्रधानांवर टीका केली म्हणून आता ‘आप’चे नेते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरूंगात टाकले. केजरीवाल यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. ते लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. काँग्रेस पक्षाचे तर बँक खाते सुद्धा गोठवले, व्यवहार बंद केले. उद्या जनतेचेही बँक खाते ते बंद करतील. एवढी टोकाची भुमिका या राज्यकर्त्यांची आहे, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.

सुप्रिया सुळे यांना तुम्ही तीनवेळा संधी दिली. संसदेत ज्यांची उपस्थिती 98 टक्के आहे असे जे दोन खासदार आहेत त्यात सुप्रिया सुळे आहेत. काम करणारी व्यक्ती संसदेत आहे. आता आपले चिन्ह तुतारी आहे लक्षात ठेवा आणि मतांचा विक्रम करा असे आवाहन पवार यांनी केले. बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ इंदापूर येथे शेतकरी कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला आमदार रोहित पवार आदी उपस्थित होते.

शेतकरी हवालदिल
शेतकऱयांच्या प्रश्नांची जाण या सरकारला नाही. सरकारने कांदा निर्यात बंदी केली. त्यामुळे कांद्याचे भाव पडले. शेतकरी हवालदिल झाला, रस्त्यावर आला. आपण साखर निर्यात करतो. त्यातून शेतकऱयांना दोन पैसे जास्त मिळतात पण केंद्र सरकारने साखर निर्यातीवर कर आणि जीएसटी लावू असे सांगितले. त्यामुळे कारखान्यात साखरेचे पोते पडून आहेत. पंतप्रधानांनी इथेनॉल निर्मिती करायला सांगितले आणि आता बंधने घातली. याचा फटका कारखान्यांना बसल्याचे पवार म्हणाले.

सामान्यांच्या सन्मानासाठी लढाई – बाळासाहेब थोरात
देशाची राज्यघटना, लोकशाही वाचविण्यासाठी ही निवडणूक आहे. सामान्य माणसाच्या सन्मानासाठी आम्ही लढत आहोत, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. विरोधकांवर ईडी कारवाई करून अटक केली जात आहे. काँग्रेस पक्षाचे बँक खाते गोठविले. भाजप दहशतीतून ही निवडणूक लढत आहे. परंतु लोकशाहीत मतदारांना तुम्ही डांबू शकत नाही. त्यामुळे पुरोगामी विचारांना लोकांनी मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले.

विरोधकांचाच करेक्ट कार्यक्रम होणार – सुप्रिया सुळे
तिन्ही निवडणुका सुसंस्कृत होत्या. पण या निवडणुकीत काय गडबड झाली हे कळत नाही. रोहीत पवार, युगेंद्र पवार हे माझा प्रचार करत आहेत. ते आजोबा शरद पवार यांच्या सोबत आहेत. पण यावेळी करेक्ट कार्यक्रम होणार अशी दमदाटी केली जात आहे. पवार साहेबांच्या सभेला जाऊ नका असे सांगितले जात आहे. पण इंदापूरची जनता अशा फोनला, धमक्यांना घाबरणारी नाही. विरोधकांनी त्यांचाच विचार करावा. कारण विधानसभा निवडणुकीत त्यांचाच करेक्ट कार्यक्रम होणार आहे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांना ठणकाविले.

चार महिन्यांनी सरकार बदलेल तेव्हा तुमचा पक्ष शिल्लक राहील का?
चार महिन्यांनी देशातील सरकार बदलणार आहे. महाराष्ट्रात फडणकीस आणि देशात मोदी नसतील. सत्ता आमच्याकडे असेल. ईडी, सीबीआयच्या दहशतीकर तुम्ही पक्ष फोडले. उद्या ही यंत्रणा आमच्याकडे असेल. तेक्हा तुमचा पक्ष शिल्लक राहिल का? असा हल्लाबोल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला.

आपले गुजरातशी भांडण नाही, गुजराती व्यापारी, गुजराती जनता आम्ही एकत्र मुंबईत, महाराष्ट्रात, देशात काम करतो. मात्र, सध्या जी कृत्ती काढत आहे, त्याला पायबंद घालण्याची गरज आहे. राजकारणातला माणूस विकासावर बोलतो, विकासाकर मते मागतो. आपण केलेल्या कामांकर मते मागतो. मात्र हे धमक्या देत मते मागतात यावरून त्यांनी विकास केला नाही, हे स्पष्ट आहे. त्यांच्या सोबत कोणी नसल्यामुळे त्यांच्याकर जनतेला धमक्या देण्याची केळ येत आहे. सध्या देशाचे कृषिमंत्री कोण आहेत ते देशाला माहिती नाही. शरद पकार कृषिमंत्री असताना 71 हजार कोटींचे कर्ज माफ केले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी दोन लाखापर्यंतची कर्जमाफी केली. महाराष्ट्राची ओळख बारामती आणि शरद पवार यांच्यामुळे आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आणि बारामतीत महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होणारच, असा विश्वासही खासदार राऊत यांनी व्यक्त केला.