आपल्याला भाजपविरोधातच लढायचंय; शरद पवारांनी केला राष्ट्रवादीतील संभ्रम दूर

मनात कोणतीही शंका ठेवू नका, आपण भाजपसोबत जाणार नाही. आपल्याला भाजपविरोधातच लढायचं आहे, असे स्पष्ट करत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दूर केला.

विरोधी पक्षनेते पद सोडून अजित पवार आपल्या समर्थक आमदारांना घेऊन सत्तेत जाऊन बसले. त्यानंतर हे सर्व आमदार आणि मंत्री पुन्हा शरद पवार यांना भेटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेल्या लोकमान्य टिळक पुरस्कार वितरण सोहळ्यास शरद पवार उपस्थित राहिल्याने राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांत संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीत आयोजित पदाधिकाऱयांच्या बैठकीत शरद पवार यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

पक्षाचे नाक आणि चिन्ह अजित पकार गटाला देण्याबाबत केंद्राकडून दबाव टाकला जात असल्याची माहिती आहे. पण काहीही झाले तरी आपण पुन्हा सगळे उभे करू. तडजोड करणार नाही, आपल्याला भाजप विरोधातच लढायचे आहे. मनात कोणीही संभ्रम ठेऊ नका, असे शरद पवार म्हणाले. आगामी निकडणुकीच्या दृष्टीने पक्षाची बांधणी करा आणि आपला विचार लोकांपर्यंत पोहचवा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.