शिवसेना महिला आघाडीची उद्यापासून ‘स्त्री शक्ती संवाद’ यात्रा

शिवसेनेच्या रणरागिणी रणमैदानात उतरल्या आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेची महिला आघाडी स्त्राr शक्ती संवाद यात्रा काढणार आहे. ही संवाद यात्रा 17 जानेवारीला विदर्भातून सुरू होणार आहे.

 शिवसेनेच्या उपनेत्या विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, ज्योती ठाकरे, संजना घाडी, राजुल पटेल, शीतल देवरुखकर, सचिव सुप्रदा फातर्पेकर आणि संपर्क संघटक रंजना नेवाळकर या संवाद यात्रेत सहभागी होणार आहेत. संपूर्ण विदर्भातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा सखोल आढावा घेत यात्रेदरम्यान महिलांशी संवाद साधणार आहेत.

17 ते 19 जानेवारी असे तीन दिवस पश्चिम विदर्भात संवाद यात्रा होईल. या यात्रेदरम्यान अमरावती, यवतमाळ, वाशीम आणि रामटेक मतदारसंघातील महिलांशी संवाद साधला जाणार आहे.

महिलांच्या समस्या जाणून घेणार

राज्यात महिला अत्याचार वाढत आहेत. त्याचबरोबर महिलांविषयी अनेक प्रश्न, समस्यांविषयीही स्थानिक महिलांशी संवाद साधला जाणार आहे. महिला आघाडीकडून मुख्यतः महिला बचत गट, अंगणवाडी सेविका आणि महिलांच्या विविध समस्यांबाबतीत संवाद साधला जाणार आहे. ही यात्रा संपूर्ण विदर्भातून जाईल. या माध्यमातून एकप्रकारे स्त्र्ााr शक्तीचा जागरच होणार आहे.