अखेरच्या पेस्ट्रीवरून भांडण, इलेक्ट्रीक व्हीलचेअरवरील वृद्धाने केला चिरडण्याचा प्रयत्न

कोणत्याही क्षुल्लक कारणाने भांडण सुरू होते, त्यानंतर ते एवढे विकोपाला जाते की, त्यात काहीजणांना प्राणही गमवावे लागतात. अशीच एक घटना युकेमधील डेव्हॉनच्या रस्त्यावर घडली आहे. एका बेकरीत खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती. त्यातच बेकरीत अखेरची एकच पेस्ट्री शिल्लक होती आणि तिच वादाला कारण ठरली. या पोस्ट्रीवरून झालेल्या भांडणात एक पेन्शनधारक वृद्ध इलेक्ट्रिक व्हीलचेअरवर बसला होता. बेकरीत अखेरची पेस्ट्री शिल्लक असल्याचे समजताच त्याने त्याची व्हीलचेअर एका तरुणावर घालत त्याला चिरडण्याचा प्रयत्न केला. या घटनेतून तो तरुण बचावला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

या दोघांमधील घटनेचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाला असून फूटेजच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी इलेक्ट्रिक व्हीलचेअर जप्त केली आहे. तसेच व्हीलचेअरवरील वृद्ध पेन्शनधारकांची ओळखही पटवली आहे. एका स्थानिक बेकरीत खरेदीसाठी गर्दी झाली होती. त्यावेळी बेकरीत एकच पेस्ट्री शिल्लक होती. आपल्यालाच पेस्ट्री मिळावी, यासाठी वृद्धाने स्वतःची व्हीलचेअर एका तरुणावर घालत त्याला चिरडण्याचा प्रयत्न केला.

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, बेकरीत शेवटची पेस्ट्री शिल्लक होती. बहुधा या वृद्धाला पेस्ट्री आवडत असावी, त्यामुळे आपल्यालाच पेस्ट्री मिळावी,यासाठी त्याने एका तरुणाला हातातील कुबडीने ढकलले आणि त्यांच्यात वाद सुरू झाला. त्यानंतर रागावलेल्या वृद्धाने त्याची इलेक्ट्रिक व्हीलचेअर थेट त्या तरुणावर घातली. तरुण त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, व्हीलचेअरच्या धक्काने तो तरुण खाली कोसळला. यानंतरही वृद्ध पेस्ट्रसाटठी ओरडतच होता, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

गर्दीतील माणसांनी पुढे होत त्या तरुणाला मदत केली. लोकांच्या मदतीने तो तरुण उभा राहतो. हा वादाची माहिती पोलिसांना मिळाल्यावर ते घटनास्थळी धाव घेतात. पोलिसांनी या घटनेतील दोघांची ओळख पटवतात. तसेच यातील इलेक्ट्रिक व्हीलचेअर जप्त करतात. आमचा या घटनेचा अधिक तपास सुरू आहे. मात्र, वृद्ध आक्रमक झाल्याने अनेकांनी पळ काढला. काही प्रत्यक्षदर्शीकडून माहिती घेतली आहे. तसेच फूटेजच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. या घटनेत कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. त्या तरुणाला किरकोळ जखम झाली आहे. मात्र, या घटनेत कोणतीही मोठी हानी झालेली नाही. एका पेस्ट्रीवरून भांडणे होत थेट दुसऱ्याच्या अंगावर व्हीलचेअर घातल त्याला चिरडण्याचा प्रयत्न केल्याची ही पहिलीच घटना पाहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.