हिंदुस्थानी संघाला मोठा झटका, ‘हा’ खेळाडू वन डे मालिकेत खेळणार नाही

हिंदुस्थान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्याच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधीच हिंदुस्थानी संघाला मोठा झटका बसला आहे. संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज हा या मालिकेत दिसणार नसून तो मायदेशी परतला आहे.

हिंदुस्थानी संघ आणि वेस्ट इंडिजच्या तीन सामन्याच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेचा पहिला सामना आज ब्रिजटाऊनमध्ये होणार असून हिंदुस्थानी वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. हिंदुस्थानी संघाला ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक हिंदुस्थानातच खेळायचा आहे. त्याआधी सप्टेंबरमध्ये आशिया कप होणार आहे. त्यात सिराजच्या घोट्याला दुखापत झाली आहे हे सर्व पाहता संघ व्यवस्थापनाने सिराजला विश्रांती दिली आहे. हिंदुस्थानी संघाने अलीकडेच कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजचा 1-0 असा पराभव केला आहे. अशा परिस्थितीत या टेस्ट मालिकेनंतर रविचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे, केएस भरत आणि नवदीप सैनी हे खेळाडू कसोटी मालिकेनंतर आपापल्या घरी परतले आहेत. सिराजही त्यांच्यासोबत मायदेशी परतला आहे. त्यामुळे आता सिराजच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर नेतृत्व करताना दिसणार आहे.

शार्दुलने आतापर्यंत 35 सामन्यांपैकी 50 विकेट घेतले आहेत. त्या व्यतिरिक्त टीममध्ये वेगवान गोलंदाज म्हणून उमरान मलिक, जयदेव उनाडकट आणि मुकेश कुमार यांची वर्णी लागली आहे. मुकेश कुमारची आता वनडेत पदार्पणाची वाट पाहत आहेत. त्यामुळे सिराजच्या पदार्पणाची शक्यता वाढली आहे. हिंदुस्थानी संघ व्यवस्थापन सिराजच्या अन्य खेळाडू बघत आहेत. त्यांच्याकडे वेगवान गोलंदाजांमध्ये हार्दिक पांड्येही आहे. हिंदुस्थानी संघाला वनडे मालिकेनंतर वेस्टइंडिजच्या दौऱ्यात 5 टी 20 मॅसामन्यांची मालिकाही खेळायची आहे. सिराज या मालिकेचा भाग असणार नाही. याच कारणामुळे तो मायदेशी परतला आहे.

हिंदुस्थानी संघ

रोहित शर्मा (कप्तान), हार्दिक पंड्या (उप-कप्तान), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर),  शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनादकट, उमरान मलिक, मुकेश कुमार.

वेस्टइंडिज संघ

शाई होप (कप्तान), रोवमॅन पॉवेल (उप कप्तान), एलिक अथानाजे, यानिक कर‍िहा, केसी कार्टी, डोमिनिक ड्रेक्स, श‍िमरॉन हेटमायर, अल्जारी जोसेफ, ब्रैंडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोटी, जेडेन सील्स, रोमारियो शेफर्ड, केविन सिंक्लेयर, ओशाने थॉमस.