बकरा मंडीत हातसफाई; पाच जणांची टोळी जेरबंद 

देवनार पशुवधगृहामधून बकरा विक्री करणाऱया व्यापाऱयाच्या खिशातून रोकड चोरी झाली होती. याप्रकरणी देवनार पोलिसांनी पाच जणांच्या टोळीला पकडून जवळपास 68 हजारांची रोकड व चोरीचे 16 मोबाईल हस्तगत केले.  

गेल्या महिन्यात देवनारच्या पशुवधगृहात बकरा मंडीत मोठय़ा संख्येने बकरा व्यापारी आले होते. 25 जून रोजी एका व्यापाऱयाच्या खिशातून रोख रक्कम चोरीला गेली होती. याप्रकरणी देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सपोनि पैलास सोनावणे, उपनिरीक्षक सुजाता बुधवंत तसेच शिंदे, आंब्रे, सांगळे, विशाल पाटील, राहुल पाटील या पथकाने तपास सुरू केला. खबऱयांच्या मदतीने तपास करत या पथकाने साबीर सिराज सय्यद (38), दस्तगीर ऊर्फ फिरोज साबीरहसन शेख (32), सलाम नईम खान (35), अब्दुला मो. आरीफ शेख (25), नासीर नईम खान (42) या  टोळीला जेरबंद केले.