वाघिणीची बछडय़ांसोबत धम्माल ‘मस्ती’

 

हरणावर झेप घेऊन एका पंजात तिचा वेध घेणाऱया वाघिणीचे वेगळेच रूप राजस्थानच्या रणथंबोर अभयारण्यात दिसले. वनअधिकाऱयांनी वाघीण आणि तिच्या बछडय़ांची मजामस्ती कॅमेऱयात कैद केली. हे बछडे वाघिणीसोबत खेळत आहेत, लोळत आहेत… धम्माल मस्ती करत आहेत… असा हा मनाचा ठाव घेणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.