एअर इंडिया एक्सप्रेसच्या त्रिची-शारजाह विमानाचे इमर्जन्सी लँडिंग

त्रिची येथून शारजाहला जाणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाचे 154 प्रवाशांसह तिरुअनंतपुरममध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. इमर्जन्सी लँडिंगमुळे विमानातील सर्व प्रवासी घाबरून गेले होते.

त्रिची-शारजाह या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फ्लाइट क्रमांक 613 ला तांत्रिक कारणामुळे सोमवारी तिरुवनंतपुरम विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. इमर्जन्सी लँडिंगमुळे प्रवाशांमध्ये एकाच गोंधळ उडाला. विमान धावपट्टीवर उतरताच सर्व सुरक्षा कर्मचारी आणि आरोग्य पथक घटनास्थळी पोहोचले.

सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तांत्रिक कारणांमुळे रात्री 12.03 वाजता विमान तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे लँडिंग करण्यात आले.